Join us  

Indian Idol Marathi : स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी गायिका अनुराधा पौडवाल यांची हजेरी !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 12:12 PM

Indian Idol Marathi :या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल (Ajay-Atul) असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे. सर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता आणि विजेती मिळणार आहे.

 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम सुरू होऊन काही आठवडे झाले आहेत. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अल्पावधीतच आपलंस केलं आहे. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच मराठी भाषेत होत आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल  असल्याने कार्यक्रमाची रंगत  वाढते आहे. सर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता आणि विजेती मिळणार आहे. या स्पर्धकांनी त्यांच्या आवाजाने आणि गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलंय. ग्रँड प्रिमिअरचा आठवडा दणक्यात झाल्यावर या आठवड्यात स्पर्धकांना आशीर्वाद देण्यासाठी, स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल खास पाहुण्या म्हणून  येणार आहेत. यावेळी त्यांना घरी परत आल्यासारखं वाटत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त.

अनुराधा पौडवाल यांनी मराठीसह हिंदी, तमीळ, उडिया, नेपाळी इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातल्या एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचं पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झालं. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'यशोदा' या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्‍यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. 

तेव्हापासून आत्तापर्यंत सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते आणि भजने यांचे गायन ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून त्या  करताहेत. अनुराधा पौडवाल यांचा वरदहस्त स्पर्धेच्या वाटचालीच्या सुरुवातीला लाभणं ही स्पर्धकांसाठी भाग्याची गोष्ट ठरली आहे. ज्यांच्या आवाजाने भक्तिरसात तल्लीन व्हायला होतं अशा लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांच्या येण्यानं 'इंडियन आयडल मराठी' ह्या मंचाच्या माध्यमातून तमाम रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे.

 

टॅग्स :इंडियन आयडॉलअनुराधा पौडवाल