Join us

अरूणिता कशी जिंकली? ‘इंडियन आयडल 12’वर संतापले पवनदीप राजनचे चाहते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 14:56 IST

Indian Idol 12 : गेल्या आठवड्यात झालेल्या बॉईज वर्सेस गर्ल्स भागावर पवनदीपचे चाहते संतापले आहेत. पवनदीप राजनसोबत भेदभाव? ट्रोल झाली अरूणिता

ठळक मुद्देया एपिसोडमध्ये पवनदीपला सर्वात वाईट वागणूक देण्यात आली, अशा शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला.

‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) च्या मंचावर गेल्या वीकेंडमध्ये बॉईज वर्सेस गर्ल्स अशी थेट लढत रंगली. एकीकडे लेडी कंटेस्टंट आणि दुसरीकडे मेल कंटेस्टंट. अनु मलिक यांनी गर्ल्स टीमचे नेतृत्व केले तर मनोज मुंतशीर यांनी बॉइज टीमचे. यावेळी सर्वांचा लाडका कंटेस्टंट पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरूणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) यांच्यात अपेक्षेनुसार  जोरदार मुकाबला पाहायला मिळाला. पवनदीप व अरूणिता यांच्यापैकी कोण जिंकणार, हे पाहण्यास चाहते उत्सुक होते आणि अशात अरूणिताने हा मुकाबला जिंकला. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. पण यानंतर जे काही झाले, ते पाहून चाहते भडकले. होय, पवनदीप या मुकाबल्यात हरल्यानंतर, आता तू पवनदीपला काय शिक्षा देशील? असा प्रश्न जजेसनी अरूणिताला केला. यावर मी त्याचे तोंड गोड करू इच्छिते, असे अरूणिता म्हणाली. तिच्या इच्छेखातर स्टेजवर केक आला आणि अचानक अरूणिता व होस्ट आदित्य नारायण यांनी मिळून अख्खा केक पवनदीपच्या चेह-यावर फासला.

नेहमी ही गोष्ट चाहत्यांना खटकली. पवनदीपच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. काहींच्या मते, बॉइज वर्सेस गर्ल्समध्ये पवनदीप अरूणितापेक्षा चांगला गायला होता. तरीही मेकर्सनी अरूणिताला विजयी घोषित केले गेले.   दुस-या स्पर्धकांना शिक्षा दिली गेली नाही मग पवनदीपलाच का? असा सवाल अनेक युजर्सनी केला. गाण्याचा मुकाबला होता, तू जिंकलीस ठीक आहे, पण अशा प्रकारे केक लावण्याची अजिबात गरज नव्हती, असे एका युजरने अरूणिताला सुनावले आहे. या एपिसोडमध्ये पवनदीपला सर्वात वाईट वागणूक देण्यात आली, अशा शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला.

पवनदीपसोबत पक्षपात?अनेक युजर्सनी पवनदीपसोबत या एपिसोडमध्ये पक्षपात झाल्याची भावना व्यक्त केली.पवनदीपला फक्त एकच गाणे गाण्याची संधी देण्यात आली होती, तर अरुणिताने 3 गाणी गायली. पवनदीप अरूणितापेक्षा चांगला गायला तरीही अरूणिताला विनर बनण्यात आले, याकडे अनेक चाहत्यांनी लक्ष वेधले. इंडियन आयडल 12 चे मेकर्स फक्त अरुणितावरच लक्ष केंद्रित करत आहेत, असा दावा काही युजर्सनी केला. पवनदीप हा ‘ इंडियन आयडल 12’चा सर्वात लोकप्रिय स्पर्धक आहे. संभाव्य विजेता म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, अशा स्पर्धकाबरोबर या प्रकारचा भेदभाव केला जात आहे. म्हणूनच अनेक चाहते सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत.

 

टॅग्स :इंडियन आयडॉल