टॉवेल में बाहर जाओगी तो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 10:30 IST
छोट्या पडद्यावरही निर्माते अनेक प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या पडद्यावर अनेकवेळा नायिका आपल्याला टॉवेलमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. ...
टॉवेल में बाहर जाओगी तो...
छोट्या पडद्यावरही निर्माते अनेक प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या पडद्यावर अनेकवेळा नायिका आपल्याला टॉवेलमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. आता छोट्या पडद्यावरही आपल्याला एक था राजा, एक थी रानी या मालिकेत बिंदूची भूमिका साकारणारी पूनम प्रीत टॉवेलमध्ये दिसणार आहे. या दृश्याचे चित्रीकरण करताना तिला चांगलेच टेन्शन आले होते. कारण चित्रीकरणाच्यावेळी टॉवेलमध्ये वावरायचे कसे आणि त्यातही टॉवेल सुटला तर काय होईल हा तिला मोठा प्रश्न पडला होता. त्यामुळे चित्रीकरणासाठी तिला घालायला एका भला मोठा टॉवेल मागवण्यात आला होता. तसेच या दृश्याच्या चित्रीकरणाच्यावेळी मालिकेच्या टीममधील केवळ मोजक्याच व्यक्ती तिथे उपस्थित होत्या. या सगळ्यामुळे चित्रीकरण करणे खूपच सोपे गेले असे ती सांगते.