बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेत्री आरती सोळंकी (Aarti Solanki) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना थक्क केले होते. तिचा फिटनेस पाहून सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. खरेतर तिने हिंदवी पाटीलच्या दुकानावर कारवाई करणाऱ्यांना आणि तिच्या चाहत्यांना खडेबोल लगावले आहेत.
हिंदवी पाटीलच्या पुण्यातील दुकानावर अतिक्रमण विभागाच्या कारवाईमध्ये हातोडा चालवण्यात आला आहे. याबाबत तिला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. तिने खूप मेहनतीने हे दुकान सुरू केले होते. अतिक्रमण विभागाच्या कारवाईमध्ये हिंदवीच्या शॉपच्या बोर्डचं तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचही मोठं नुकसान झालं. या कारवाईनंतर हिंदवीला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. तिचा व्हिडीओ शेअर करत आरती सोलंकीने नाराजी व्यक्त केलीय.
आरती सोलंकीने पोस्टमध्ये लिहिले की, ''कुठे गेले ते मिलियन फॉलोव्हर्स आणि नेते मंडळी जे ह्यांचे शोज ठेवतात. बाई नाचताना बघायला आवडते पण कष्ट करुन पोट भरताना नाही. माझ्या सारखे नीच वृत्तीची माणसं ह्या मुलींना नाव ठेवतात की ह्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या बिहार झालाय. सत्य हे आहे की ह्यांना नाचवणाऱ्यांनी बिहार केलाय. मी ह्या मुलीची बाजू घेत नाहीय. कुठल्याही स्त्रीला असा नाच करायला आवडत नाही. ती फक्त पोट भरण्यासाठी स्वतःचं घर चालवण्यासाठी हे करत असते. आज ग्या हिंदवी पाटीलच्या शोवर बंदी नाहीये पण तिच्या दुकानावर कारवाई केली जाते. ह्यांचे जे शो ठेवतात खरंतर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. गरीबाने कष्ट करू नये. फालतुगिरी केली तर चालणार आहे. आज ती कष्ट करुन पोट भरू पाहते तर तिला समाजाने पाठिंबा दिला पाहिजे.''