Join us

​मी फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधात राग व्यक्त केला- कपिल शर्मा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 12:28 IST

शेवटी सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने मौन सोडले असून असे जाहीर केले की, आपण ट्वीट करुन फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधात आपला ...

शेवटी सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने मौन सोडले असून असे जाहीर केले की, आपण ट्वीट करुन फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधात आपला राग व्यक्त केला होता. कपिलने ट्वीटद्वारे असे म्हटले होते की, बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने कामाच्या बदल्यात पाच लाखाची लाच मागत आहे. या ट्वीटवरुन बराच वादही झाला. त्यानंतर कपिलने मौन धारण केले होते, मात्र नुकतेच त्याने मौन सोडले असून सांगितले की, ‘मी फक्त आपला राग व्यक्त केला, मात्र हा वाद विकोपाला गेला. माझी जागा मनोरंजन जगतात आहे, बातम्यांच्या जगात नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही आणि असे करण्याची माझी इच्छादेखील नाही. पुढे कपिल म्हणाला की, ‘मी माननीय प्रधानमंत्री, केंद्र सरकार आणि राज्य सरकारसोबतच त्यांच्या एजंसी आणि नियमांचा खूपच आदर करतो. मी कायद्यावर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. ’}}}}