हम तो तेरे आशिक है ही मालिका या हिंदी मालिकेचा रिमेक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 17:17 IST
भाभीजी घर पर है ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड लाडकी असून या मालिकेतील विभूती, अंगुरी, अनिता, मनमोहन या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना ...
हम तो तेरे आशिक है ही मालिका या हिंदी मालिकेचा रिमेक?
भाभीजी घर पर है ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड लाडकी असून या मालिकेतील विभूती, अंगुरी, अनिता, मनमोहन या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवड आहेत. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. या मालिकेत या व्यक्तिरेखा साकारणारे आशिफ शेख, रोहिताश गौड, शुभांगी अत्रे, सौम्या टंडन हे कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेच्या धर्तीवर अनेक मालिका वेगवेगळ्या भाषांमध्ये बनवल्या गेल्या आहेत.झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना लवकरच हम तो तेरे आशिक है ही मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा प्रोमो पाहून ही मालिका काहीशी भाभीजी घर पर है या मालिकेसारखीच असल्याची वाटत आहे. कारण या मालिकेत प्रेक्षकांना दोन जोडपी पाहायला मिळत असून ही दोन्ही जोडपी एकमेकांचे शेजारी असल्याचे दाखवण्यात आले आहे. या मालिकेत प्रसाद ओक आणि दिप्ती केतकर तसेच पुष्कर श्रोती आणि त्याची पत्नी असे चार जण पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही कथा काहीशी भाभीजी घर पर है या मालिकेशी सार्धम्य राखणारी आहे असेच सगळ्यांना वाटत आहे. प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोती यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. प्रीत तुझी माझी, गोळाबेरीज, हिप हिप हुर्रे, हाय काय नाय काय यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला प्रसाद आणि पुष्कर यांची जोडी पाहायला मिळाली आहे. त्यांच्या जोडीचे चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडतात. प्रसाद आणि पुष्कर खऱ्या आयुष्यात खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांच्यात असलेली मैत्री अतिशय घट्ट असल्यानेच त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून प्रसाद आणि पुष्कर दोघेही आपापल्या कामात व्यग्र होते. प्रसादने कच्चा लिंबू या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. प्रसादप्रमाणे पुष्करने देखील नुकत्याच उबंटू या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्याच्या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. पुष्करच्या पत्नीनेच फेसबुकला पोस्ट करून हे दोघे एकत्र काम करणार असल्याचे सगळ्यांना सांगितले होते. या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यावर तर त्यांच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे. Also Read : प्रसाद ओकच्या हिरकणी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात