Join us  

Rising Star 3 : अन् अमिताभ बच्चन यांचे नाव ऐकून रेखा झाल्या ‘स्पीचलेस’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 11:39 AM

बॉलिवूडची सदाबहार ब्युटी रेखा यांनी अलीकडे ‘राइझिंग स्टार 3’ या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. पिवळ्या रंगांची आणि हिरव्या काठांची भरजरी साडी, गळ्यांत कुंदनचा नेकलेस असा त्यांचा थाट पाहून सगळेच रेखांच्या प्रेमात पडले. यादरम्यान एक खास क्षणही सर्वांनी अनुभवला.

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत चिरतरुण सौंदर्य आणि घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलीवुड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे. बॉलिवूडची सदाबहार ब्युटी रेखा यांनी अलीकडे ‘राइझिंग स्टार 3’ या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. पिवळ्या रंगांची आणि हिरव्या काठांची भरजरी साडी, गळ्यांत कुंदनचा नेकलेस असा त्यांचा थाट पाहून सगळेच रेखांच्या प्रेमात पडले. ‘राइझिंग स्टार 3’चा सलाम-ए-रेखा हा एपिसोड रेखा यांना समर्पित होता. रेखा यांनी या शोमध्ये गाणे गायले. शिवाय डान्सही केला. साहजिकट स्पर्धकांसकट सगळ्यांनीच रेखाचा हा डान्स एन्जॉय केला. यादरम्यान एक खास क्षणही सर्वांनी अनुभवला. तो क्षण म्हणजे, जेव्हा ‘राइझिंग स्टार 3’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या नावाचा उल्लेख झाला.

चेतन बृजवासी, ओप्संग आणि विश्वजा हे तिघे स्पर्धक वेगवेगळ्या गेटअपमध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेजवर आलेत. त्यांना पाहून रेखा यांनी चेतन बृजवासीला पाहून तू कोणता स्टार बनून आला आहेस? असा प्रश्न केला. चेतनने मी अमिताभ बच्चन बनून आलोय, असे सांगितले. चेतनच्या तोंडून अमिताभ यांचे नाव ऐकून सेटवर उपस्थित लोक हूटिंग करू लागले आणि इकडे अमिताभ यांचे नाव ऐकताच रेखा चक्क लाजल्या. त्यांच्या अख्ख्या चेहऱ्याभर हसू पसरले. इतके की, बोलण्यासाठी त्यांना शब्द सुचेनात. त्यांनी अनेकदा माईक हाती घेतला. पण त्यांच्या तोंडून एक शब्दही फुटेना. हा क्षण सगळ्यांसाठीच खास होता. यानंतर रेखा यांनी कशीबशी हा क्षण सांभाळला आणि कार्यक्रम पुढे रेटला.

टॅग्स :रेखा