Join us  

रोहन गुजर सांगतोय, तुझ्याशिवाय सगळंच अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 1:47 PM

रोहनने नुकतीच फेसबुकला पोस्ट टाकली असून तुझ्याशिवाय सगळंच अपूर्ण असे लिहिले आहे. त्याने ही पोस्ट त्याच्या पत्नीसाठी नव्हे तर एका वेगळ्याच गोष्टीसाठी टाकली आहे.

ठळक मुद्दे कॅमेराशिवाय त्याचे आयुष्यच अपूर्ण आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखादा प्रोजक्ट संपल्यानंतर आम्हा कलाकारांसमोर एक यक्ष प्रश्न नेहमीच असतो की, आता पुढे काय? पुढचा प्रोजेक्ट कधी मिळणार? आता पुन्हा कॅमेरा समोर कधी जाणार? पण मी सध्या खूश आहेकारण मला एक नवीन चित्रपटाची ऑफर आली असून मी या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. हे सगळे मी खूप एन्जॉय करत आहे असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.

होणार सून मी या घरची ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. या मालिकेतील जान्हवी, श्री या मुख्य व्यक्तिरेखांसोबतच पिंट्या, ताई मावशी या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या होत्या. रोहन गुजरने या मालिकेत साकारलेल्या पिंट्या या भूमिकेमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ही मालिका संपून अनेक महिने झाली असली तरी प्रेक्षक आजही त्याला याच नावाने ओळखतात. त्या मालिकेनंतर त्याने बन मस्का या मालिकेत काम केले. या मालिकेतील त्याचे काम देखील प्रेक्षकांना भावले होते. यानंतर तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. रोहनने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने काही महिन्यांपूर्वी एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते आणि या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत त्याने एका लघुपटाची निर्मिती केली होती.

रोहनचे लग्न काहीच महिन्यांपूर्वी स्नेहल देशमुखशी झाले आहे. रोहनने नुकतीच फेसबुकला पोस्ट टाकली असून तुझ्याशिवाय सगळंच अपूर्ण असे लिहिले आहे. त्याने ही पोस्ट त्याच्या पत्नीसाठी नव्हे तर एका वेगळ्याच गोष्टीसाठी टाकली आहे. त्याच्यानुसार कॅमेराशिवाय त्याचे आयुष्यच अपूर्ण आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखादा प्रोजक्ट संपल्यानंतर आम्हा कलाकारांसमोर एक यक्ष प्रश्न नेहमीच असतो की... आता पुढे काय? पुढचा प्रोजेक्ट कधी मिळणार? आता पुन्हा कॅमेरा समोर कधी जाणार? पण मी सध्या खूश आहे. कारण मला एक नवीन चित्रपटाची ऑफर आली असून मी या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. हे सगळे मी खूप एन्जॉय करत आहे.

धुम्रपान करणे हे आरोग्यास घातक आहे असे सांगूनही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. धुम्रपान याच मुद्द्यावर आधारित अॅक्टिव्ह पॅसिव्ह अशी शॉर्टफिल्म रोहनच्या प्रोडक्शन हाऊसने बनवली होती. यात त्याने स्वतः अभिनयदेखील केला होता. या शॉर्टफिल्ममध्ये आकांक्षा गाडेदेखील मुख्य भूमिकेत होती. आकांक्षाने अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत काम केले होते. या शॉर्टफिल्मला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

टॅग्स :रोहन गुजर