याआधी ही यूजर्सनी ड्रेसवरुन हिना खानला ट्रोल केले होते. हिनाने फिशटेल स्टाइल ड्रेसवरील फोटो अपलोड केला होता लोकांनी त्यास उलटसुलट कॉमेण्ट देण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी तिला अतिशय अपशब्दांमध्ये खडेबोल सुनावले होते. केवळ १४ तासांच्या आतच तिच्या या फोटोंना दोन लाख ३५ हजारांपेक्षा अधिक लाइक्स मिळाल्या. त्याचबरोबर हजारो कॉमेण्ट्स दिल्या. एकीकडे हिनाचे चाहते तिच्या आउटफिटचे कौतुक करीत असताना अनेकांनी त्यास उलट सुलट कॉमेण्ट्स दिल्या. विशेष म्हणजे हिनाच्या या फोटोंवरून तिचे चाहते अन् अन्य यूजर्समध्ये चांगलीच खडाजंगी बघावयास मिळाली. कारण काही चाहते तिच्या या फोटोंचे कौतुक करताना दिसले तर काही तिच्यावर टीका करताना बघावयास मिळाले होते.
हिना खानने तिचे हे फोटो दुबई येथे शूट केले आहेत. तिचा हा ड्रेस फॅशन डिझायनर निकिता टंडन हिने डिझाइन केला. तर या ड्रेसवर हिनाने घातलेली एक्सेसरिज ओम ज्वेलर्सने डिझाइन केली. हिना दुबई अगोदर श्रीलंका येथे गेली होती. ज्याठिकाणी तिने एका ब्रॅण्डसाठी मॉडलिंग केली.