Join us  

हिना खानचा वर्कआउट व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:32 PM

झिरो फिगर मेटेंन करण्यासाठी ती  जिमबरोबरच योग्य डाएटसुद्धा फॉलो करते. तिच्या वेगवेगळे वर्कआउट व्हिडीओ ती तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये अक्षराच्या रुपात घराघरांत पोहोचलेली हिना सध्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ऑनस्क्रीन कामामुळे जशी हिना चर्चेत असते. त्याचप्रमाणे ऑफस्क्रीनही ती वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या स्टायलिश लूकमुळे तर कधी तिच्या फिटनेस फंडामुळे चर्चेत असते. आता पुन्हा हिना अशाच एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.  हिना खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती जिममध्ये घाम गाळताना दिसतेय. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात अशा कलाकारांपैकी एक म्हणजे हिना खान.

ती आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. झिरो फिगर मेटेंन करण्यासाठी ती  जिमबरोबरच योग्य डाएटसुद्धा फॉलो करते. तिच्या वेगवेगळे वर्कआउट व्हिडीओ ती तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. त्यापैकी तिचा एक वर्कआऊट व्हीडीओ सध्या सोसल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.   व्हिडिओमध्ये शोल्डर टोन्ड एक्सरसाइज करताना पाहायला मिळते.

कोमोलिकाच्या रुपात हिना खानला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आपल्या आकर्षक मादक सौंदर्याच्या जोरावर कोमोलिका प्रेक्षकांना पुन्हा  आपल्या प्रेमात पाडण्यात यशस्वी होईल अशी या मालिकेच्या टीमला खात्री होती. मात्र ही भूमिका साकारणे खुद्द हिनासाठी खूप आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे. हीच भूमिका काही वर्षापुर्वी उर्वशी ढोलकियाने साकारली होती. त्यामुळे कुठेतरी तुलना होणार हे माहिती होते.

कोमोलिकाच्या रोलविषयी ती म्हणाली,  'एकता कपूरच्या वतीने मला पहिला कॉल आला, तेव्हा मी हैराण झाले होते. कारण एकतासमोर माझ्या तोंडून आवाजच निघाला नाही. मलाच कोमोलिकाच्या रोलसाठी का निवडले हा माझा तिला पहिला प्रश्न होता. ती म्हणाली, तुझ्यात खलनायिका साकारण्याचे पोटँशिअल आहे. अतिशय नर्व्हसही होते, पण एकताने माझ्यावर विश्वास दाखवला. आणि आज कोमोलिकेच्या भूमिकेत रसिकांची पसंती मिळत असल्याचे पाहून आनंद वाटत असल्याचेही तिने दिलेल्या एका मुलाखती म्हटले आहे.  

टॅग्स :हिना खान