Join us  

​हाय फिव्हर... डान्स का नया तेवरमध्ये इशा गुप्ता दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 5:13 AM

TVवरील सुपरहिट रिअॅलिटी शो हाय फिव्हर.. डान्स का नया तेवर आता अधिक ग्लॅमरस होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताने ...

TVवरील सुपरहिट रिअॅलिटी शो हाय फिव्हर.. डान्स का नया तेवर आता अधिक ग्लॅमरस होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताने या शोच्या ग्लॅमरस कोशण्टमध्ये भर घातली आहे. फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी इशा आता या शोमध्ये अहमद खान आणि लारा दत्ता यांच्यासोबत परीक्षकाच्या खुर्चीत बसणार आहे. नृत्यप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या हाय फिव्हर... या अद्वितीय शोने आजवर जेठ–बहू, नणंद–भावजय, गुरू–शिष्य, माय-लेक अशा जोड्यांमध्ये स्पर्धा करून सर्व आगामी डान्स रिअॅलिटी शोसाठी आदर्श घालून दिला आहे. अभिनेत्री, मॉडेल, मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब पटकावणारी इशा हाय फिव्हर.. डान्स का नया तेवर या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या शोच्या माध्यमातून देशातील सर्वोत्तम नर्तकाची निवड करण्यात येणार आहे. इशाचा कायमच परफेक्शनवर भर असल्यामुळे स्पर्धकांनाही तितक्याच तोडीचा परफॉर्मन्स देण्याचे आता बंधन राहणार आहे. तिच्या भूमिकेत स्पर्धकांना साहाय्य करत मार्गदर्शन करणाऱ्या परीक्षिकेच्या भूमिकेत ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात डान्स फिव्हरमध्ये प्रेक्षकांची मतेही ग्राह्य धरण्यात येणार असल्याने हा शो आणखी पुढच्या पातळीवर पोहोचला आहे. अशातच, इशाने या शोमध्ये प्रवेश केल्यामुळे तिचे सह-परीक्षक आणि स्पर्धकही तिच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. हाय फिव्हरमध्ये परीक्षक म्हणून येत असल्याबद्दल इशा सांगते, “नृत्यकला ही कायम माझ्या हृदयाजवळची कला असून एक वैविध्यपूर्ण नर्तिका म्हणून इथे येणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. & TVसोबत टेलिव्हिजनवरील हा माझा पहिलाच शो असून परीक्षकाची भूमिका निभावण्यासाठी मी फारच उत्सुक आहे. नाती सुंदरपणे बांधली जाऊन नृत्याच्या माध्यमातून त्यांचे प्रतिबिंब पाडण्याची हाय फिव्हर शोची कल्पना फारच कौतुकास्पद असून यामुळेच मी या शोकडे आकर्षित झाले. मी याचे काही भाग पाहिले आहेत आणि अहमद आणि लारा दोघांनीही आजवर गुणवत्ता शोधण्याचे जे उत्तम काम केले आहे, त्यात आता सहभागी होताना मलाही आनंद होतो आहे. हा आधीच सुस्थापित शो असल्यामुळे, जागतिक व्यासपीठावर प्रेक्षकांसमोर स्वतःला सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टी माझ्या वैयक्तिक अनुभवांतून मी या स्पर्धकांशी शेअर करणार आहे.’’इशाने कमाण्डो, बादशाहो, रुस्तम, बेबी, राज ३ डी, जन्नत २ आदी चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. हाय फिव्हर शोमुळे २०१८ हे इशासाठी छोट्या पडद्यावर आगमनाचे वर्ष ठरले असून पलटण या आंतरराष्ट्रीय चित्रपटातही ती यावर्षी प्रेक्षकांना दिसणार आहे.