Join us

'हे मन बावरे' फेम अभिनेत्रीच्या लेकाचं थाटात पार पडलं बारसं, ठेवलं हे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 18:33 IST

He Man Bawre : गेल्या महिन्यात 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' फेम अभिनेत्रीदेखील नुकतीच आई झाली आहे.

मागील वर्षभरात मराठी मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी पालकत्व स्वीकारले आहे. धनश्री काडगांवकर, मिनाक्षी राठोड, मृणाल दुसानिस सारख्या अनेक दिग्गज अभिनेत्रींनी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. गेल्या महिन्यात 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' फेम अभिनेत्रीदेखील नुकतीच आई झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री सायली परब (Saylee Parab)... दोन महिन्यात सायलीला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. नुकताच मीनाक्षीच्या लेकाचा बारश्याचा सोहळा पार पडला आणि तिने तिच्या लेकाच्या बारश्याचे फोटो शेअर करत त्याचे नावही सांगितले आहे. 

सायली परब हिने तिच्या चिमुकल्याचं नाव कबीर ठेवलंय. सोशल मीडियावर सायलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती, तिचा पती इंद्रनील शेलार आणि त्यांचा लेक दिसतो आहे आणि बाजूला कबीर असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं पाहायला मिळतयं. सायलीच्या लेकाचा बारसा अगदी थाटात पार पडला. त्यांच्या या फोटोवर मृणाल दुसानिसने अभिनंदन सायली आणि इंद्रनील अशी कमेंट केलीय. तर अन्विता फलटणकरने आणि ऋतुजा बागवेने हार्ट इमोजी कमेंट केल्यात. 

सायली ही नुकतीच आई झाली आहे. गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर म्हणजेच १९ ऑगस्टला तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. इन्स्टाग्रामवर बाळाच्या चिमुकल्या हातांचा फोटो शेअर करत तिने ही गुड न्यूज शेअर केली होती. सायलीचा पती इंद्रनील शेलार हा देखील एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी खूपच खास होता. सायली सध्या तिचे आईपण एन्जॉय करतेय. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असून तिने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटोही शेअर केले होते. दरम्यान सायलीने प्रेग्नंसीच्या काळात बेबी बंपचे क्यूट फोटोही शेअर केले होते.