Join us  

हेमांगी कवी झळकणार हिंदी मालिकेत, अभिनेत्री म्हणाली - "मराठीच असल्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 2:07 PM

Hemangi Kavi : हेमांगी कवी नव्या हिंदी मालिकेत काम करताना दिसणार आहे. यात ती भवानी चिटणीसची भूमिका साकारणार आहे. ही खुशखबर तिने खुद्द सोशल मीडियावर दिली आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. शेवटची ती स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेत पाहायला मिळाली. दरम्यान आता ती नव्या हिंदी मालिकेत काम करताना दिसणार आहे. यात ती भवानी चिटणीसची भूमिका साकारणार आहे. ही खुशखबर तिने खुद्द सोशल मीडियावर दिली आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी हिने इंस्टाग्रामवर मालिकेतल्या तिच्या लूकचा फोटो शेअर करत लिहिले की, आजपासून येतेय तुमच्या भेटीला! एक नवी भूमिका घेऊन! भवानी चिटणीस म्हणून! रोज रात्री १० वा; फक्त @zeetv आणि @zee5 वर. ‘कैसै मुझे तुम मिल गए’ मालिकेमध्ये! हिंदी मालिकेमध्ये मराठी पार्श्वभूमी असलेलं पात्र साकारताना अतिशय आनंद होत आहे. मालिकेच्या निर्मात्या @muktadhond मराठीच असल्यामुळे आपसुक एक आपलेपणा आणि तितकाच मोकळेपणा अनूभवायला मिळतोय!

हाच आनंद तुमच्यापर्यंत पोचवण्याचं आणि तुमचं १००% मनोरंजन करता यावं हे बळ आम्हांला मिळो हीच ईच्छा! आतापर्यंत जसं प्रेम, आशीर्वाद देत आलात यापुढेही देत रहा ही विनंती!, असे हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

वर्कफ्रंट...

हेमांगी कवीने याआधी 'तेरी लाडली मै' या हिंदी मालिकेत महत्तवपूर्ण भूमिकेत दिसली होती. तिने 'अवघाचि संसार', 'मन धागा धागा जोडते नवा', 'वादळवाट', 'लेक माझी दुर्गा', 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती सुष्मिता सेनसोबत ताली या वेबसीरिजमध्ये झळकली आहे. क्रिकेटर युवराज सिंह आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जाहिरातीत स्क्रीन शेअर केल्यामुळे ती चर्चेत आली होती.  

टॅग्स :हेमांगी कवी