Join us  

‘दिल ही तो है’ मध्ये फरीदा दादी साकारणार कभी खुशी कभी गम या चित्रपटातील या पात्राशी सार्धम्य असलेली व्यक्तिरेखा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 7:52 AM

एकता कपूर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर दिल ही तो है ही एक बहु प्रतिक्षित प्रेमकथा घेऊन येत आहे. बर्‍याच काळापासून ...

एकता कपूर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर दिल ही तो है ही एक बहु प्रतिक्षित प्रेमकथा घेऊन येत आहे. बर्‍याच काळापासून प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी चर्चा सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मोठमोठे कलाकार घेण्यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. बिजय आनंद आणि गीतांजली टिकेकर यांची निवड मालिकेसाठी या आधीच करण्यात आलेली आहे. यातच आता सामील होत आहे ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा दादी. फरीदा दादी दिल ही तो है या मालिकेत तारी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. तारी एक प्रेमळ, सौम्य आणि लाघवी आहे. फरीदा दादी यांनी आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमधून काम केलेले आहे आणि त्या प्रेमळ आजी म्हणून प्रसिद्ध आहेत. या मालिकेतील त्यांची भूमिका करण जोहरच्या कभी खुशी कभी गम या चित्रपटात फरीदा जलाल यांनी साकारलेल्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना फरीदा दादी सांगतात, “एकता कपूरशी माझे संबंध खूप जुने आणि चांगले आहेत. मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारण्यात आले, तेव्हा मला या व्यक्तिरेखेचे चित्रण खूप भावले होते आणि मी या मालिकेत काम करावे ही एकता कपूरची मनापासून इच्छा होती. मी फरीदा जलालने साकारलेल्या भूमिकेशी मिळती-जुळती भूमिका साकारत आहे याचा मला विशेष आनंद होतो आहे. कारण प्रत्यक्ष जीवनात आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. ‘दिल ही तो है’च्या आधी एकता कपूरने मला तिच्या इतर मालिकेत देखील काम करण्यासाठी विचारले होते. पण काही कारणामुळे मी त्या मालिकांमध्ये काम करू शकले नव्हते. आता पुन्हा एकदा मी एकता सोबत काम करते आहे याचा मला खूप आनंद होत आहे. एकता आपले जुने संबंध खूप चांगल्या प्रकारे जपते हे सर्वांनाच ठाऊक आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन सोबत काम करणे हे नेहमीच मनाला प्रसन्नता देणारे असते आणि पुन्हा त्यांच्यासोबत काम करताना मला खूप आनंद होतो आहे. काम करण्यास आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास मी उत्सुक आहे.Also Read : दिल ही तो है या मालिकेत गीतांजली टिकेकर झळकणार या भूमिकेत