Join us  

​दिल संभल जा जरा ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 8:03 AM

दिल संभल जा जरा या मालिकेत निकी अनेजा वालिया, संजय कपूर, स्मृती कालरा आणि अशिम गुलाटी यांच्या मुख्य भूमिका ...

दिल संभल जा जरा या मालिकेत निकी अनेजा वालिया, संजय कपूर, स्मृती कालरा आणि अशिम गुलाटी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेद्वारे निकी आणि संजय कपूर यांनी अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. निकी तर एकेकाळी छोट्या पडद्यावर प्रचंड प्रसिद्ध होती. तिची अस्तित्व एक प्रेमकहाणी या मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली होती. त्यामुळे दिल संभल जा जरा या मालिकेकडून प्रेक्षकांना खूप साऱ्या अपेक्षा होत्या. पण या मालिकेला सुरुवातीपासूनच टिआरपीच्या रेसमध्ये आपले स्थान निर्माण करता आले नाही आणि आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दिल संभल जा जरा या मालिकेची कथा ही काहीशी हटके असल्याने ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री होती. पण या मालिकेला प्रेक्षकांच्या मनात तितकीशी जागा निर्माण करता आली नाही. त्यामुळे केवळ तीनच महिन्यात या मालिकेचा गाशा गुंडाळण्यात आला. या मालिकेच्या टीमने शेवटच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच केले असून या मालिकेचा शेवटचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग दोन फेब्रुवारीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.दिल संभल जा या मालिकेत प्रेक्षकांना अहाना आणि अनंत माथुर यांची कथा पाहायला मिळाली होती. अहाना आणि अनंत यांचे लग्न झालेले असून अनंत नेहमीच आपल्या कुटुंबाला पहिले प्राधान्य देतो असे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्याचे आपल्या कुटुंबियांवर खूप प्रेम होते. तो अहानाची प्रचंड काळजी घेत असल्याचे दाखवण्यात आले होते. पण त्यांच्या या नात्यामध्ये एक अबोल सत्य होते, ज्यामुळे अनंत अहानासाठी योग्य ठरत नव्हता आणि त्यामुळे त्यांचे नाते धोक्यात आले होते. लग्न ही अहानाची सर्वांत मोठी चूक होती. अहाना एक आधुनिक, स्वतंत्र विचारांची मुलगी असून तिने आपल्या आईवडिलांचे लग्न मोडताना पाहिले होते. तिचा लग्नव्यवस्थेवर विश्वास होता आणि त्यामुळेच आपल्या पतीसोबतचे आपले नाते टिकावे यासाठी काहीही करण्याची तिची तयारी होती. ही मालिका खूप चांगल्या वळणावर संपणार असल्याचे म्हटले जात आहे. Also Read : या अभिनेत्रींसोबत होते संजय कपूरचे अफेअर