Join us

तो आला अन् बाहेर पडलासुद्धा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 13:49 IST

सगळ्या चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतातच. मात्र काही तर वेळेआधी संपतात आणि त्याची जास्त चर्चा होते. असंच काहीसं ...

सगळ्या चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतातच. मात्र काही तर वेळेआधी संपतात आणि त्याची जास्त चर्चा होते. असंच काहीसं घडलंय अभिनेता मयांक गांधीबाबत. काही दिवसांपूर्वीच मयांकनं ‘चक्रवर्ती अशोका सम्राट’ मालिकेत एंट्री मारली होती. मयांकनं मालिकेच्या टीमसोबत तीन दिवस शुटिंग केलं. मात्र तीन दिवसानंतर कळतंय की मयांक या मालिकेचा भाग असणार नाही. या मालिकेच्या एखाद-दुस-या भागात रसिकांना मयांकचं दर्शन घडलं असावं. मयांकची व्यक्तीरेखा मालिकेच्या कथेशी मेळ खात नसल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं मयांक साकारत असलेली व्यक्तीरेखाच काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याबाबत निर्माते आणि क्रिएटिव्ह टीमनं मयांकशीही चर्चा केली. या चर्चेअंती मयांकनंही मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मालिकेत पात्राची गरज नसेल तर ते का ठेवतील असं मयांकनं म्हटलंय. मालिकेची गरज आणि इतर कमिटमेंट्स पाहता मालिकेतून बाहेर पडत असल्याचं मयांकनं म्हटलंय. तसंच भविष्यात या निर्मात्यांसह काम करण्याची संधी मिळाल्यास आवर्जून करु, त्यांच्याबद्दल कुठलाही राग नसल्याचंही त्यानं नमूद केलंय.