पुरुषी वृत्तीवर संतापणारी ‘माझ्या नव-याची बायको’मधील ‘रेवती’चा हा अंदाज तुम्ही कधी पाहिला आहे का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 13:30 IST
'माझ्या नव-याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. ...
पुरुषी वृत्तीवर संतापणारी ‘माझ्या नव-याची बायको’मधील ‘रेवती’चा हा अंदाज तुम्ही कधी पाहिला आहे का ?
'माझ्या नव-याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. गुरुनाथ, शनाया, राधिका यांच्यातील जुगलबंदी रसिकांना भावते आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेत राधिकाला तिच्या अडचणीच्या काळात मदत करणारी तिची मैत्रीण म्हणजे रेवती. गुरुनाथ विरोधातील लढाईत राधिकाला रेवतीची खंबीर साथ लाभते. या मालिकेत रेवतीला पुरुष, पुरुषी वृत्तीबद्दल प्रचंड राग दाखवण्यात आला आहे. मालिकेत तिचं लग्न मोडलं असून लेकीचा सांभाळ करते. गुरु आणि शनायाच्या अफेअरचा सगळ्यात आधी संशय हा रेवतीलाच येतो. रेवतीची मदत घेऊन राधिकाने शनाय आणि गुरुनाथला धडा शिकवला आहे. रेवतीची हीच भूमिका अभिनेत्री श्वेता मेहंदळे हिने साकारली आहे. श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे. या गोजिरवाण्या घरात या मालिकेत राहुल आणि श्वेता एकत्र झळकले होते. या मालिकेत काम करत असतानाच दोघांमध्ये आधी मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर श्वेता आणि राहुल यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. राहुल आणि श्वेता यांच्या जीवनात आर्य नावाचा त्यांचा मुलगाही आहे. माझ्या नव-याची बायको या मालिकेत गंभीर आणि पुरुषांवर तिरस्कार करणा-या महिलेची भूमिका श्वेता साकारत असली तरी रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे. पती राहुल, मुलासह श्वेता धम्माल करत असते. नातेवाईक आणि मित्रांसहसुद्धा ती फुल्ल ऑन एन्जॉय करते. याच धम्माल मस्तीचे फोटो श्वेता वेळोवेळी शेअर करत असते. माझ्या नव-याची बायको या मालिकेआधी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये श्वेतानं अभिनय केला आहे. नायक, या गोजिरवाण्या घरात, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय धूम 2 धमाल, पाच नार एक बेजार, सगळं करुन भागलं, असा मी तसा मी, जावईबापू जिंदाबाद अशा सिनेमांमध्येही श्वेताने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.