Join us  

​सरस्वती या मालिकेत होणार हरिश दुधाणेची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2017 9:23 AM

हरिश दुधाणेने माझे मन तुझे झाले या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली ...

हरिश दुधाणेने माझे मन तुझे झाले या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. पण या मालिकेनंतर तो गेल्या काही महिन्यांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण आता तो एका खूप चांगल्या भूमिकेत परतत आहे. सरस्वती या मालिकेत तो आता झळकणार असून लवकरच या मालिकेत त्याची एंट्री होणार आहे. सरस्वती या मालिकेच्या कथानकाला नुकतेच एक वळण मिळाले आहे. या मालिकेत सरस्वती आणि राघव दुबईला फिरायला गेले होते. पण तिथे राघववर हल्ला झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाला. मालिकेच्या कथानकाला मिळालेल्या या कलाटणीमुळे  प्रेक्षकांना देखील चांगलाच शॉक बसला.सरस्वती या मालिकेत राघवच्या मृत्यूमुळे सरस्वती संपूर्णपणे खचलेली आहे. सरस्वतीला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आता एका नव्या व्यक्तिरेखेची मालिकेत एंट्री होणार आहे. या मालिकेत आता रणजीत या नव्या पात्राची एंट्री होणार असून तो राघवचा सावत्र भाऊ असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. रणजीत ही व्यक्तिरेखा खूपच चांगली आहे. आपल्या मर्जीने आयुष्य जगणारा, अतिशय मस्तीखोर, खेळकर असा हा रणजीत आहे. हरिशने माझे मन तुझे झाले या मालिकेत साकारलेल्या भूमिकेपेक्षा सरस्वती या मालिकेतील त्याची भूमिका खूपच वेगळी आहे. एक वेगळाच हरिश या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हरिशच्या एंट्रीनंतर या मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे. राघव आयुष्यातून गेल्यानंतर आता रणजीत सरस्वतीच्या आयुष्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे हरिशची या मालिकेतील व्यक्तिरेखा खूपच महत्त्वाची असणार आहे.