Join us

हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा चक्क चुलीवर स्वयंपाक करताना दिसली, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 16:32 IST

हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा हिने चुलीवर स्वयंपाक करतानाचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या फोटोला युजर्सकडून चांगलेच पसंत केले जात आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध फिरकीपटू हरभजन सिंग याची पत्नी आणि अभिनेत्री गीता बसरा लग्नानंतर जणूकाही गायब झाली होती. मात्र आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गीताने गेल्या काही काळापासून बॉलिवूडपासून अंतर निर्माण केले आहे. मात्र सोशल मीडियावर ती नेहमीच पती हरभजनसोबतचे फोटो शेअर करीत असते. त्याचबरोबर मुलगी हिनायासोबतही ती नेहमीच स्पॉट होत असते. गीताने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला ज्यामुळे ती पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आली आहे. गीताच्या या फोटोला तिच्या चाहत्यांकडून तुफान लाइक्स मिळत आहेत, शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेण्ट्सही मिळत आहेत. फोटोमध्ये गीता चक्क चुलीवर जेवण बनविताना दिसत आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोला मजेशीर कॉमेण्टही दिल्या आहेत. गीता सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करीत असते. गीताने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये ‘मजा पिंड दा’ असे लिहिले. त्याचबरोबर काही इमोजीचाही वापर केला. फोटोमध्ये गीताने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती चुलीसमोर बसलेली असून, खूपच आनंदी दिसत आहे. गीताच्या या फोटोला आतापर्यंत ३७ हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केले आहे. यावेळी गीताने दुसराही एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती पती हरभजन सिंगसोबत बघावयास मिळत आहे.  गीताच्या फोटोला स्मार्टी शुक्ला नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने लिहिले की, ‘चप्पल, सॅण्डल चक्क किचनमधील चुलीसमोर’, एका युजरने लिहिले की, ‘जालंधर पिंड नाही, कृपा करून त्याचा सन्मान कर’ तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुला चूल पेटविता येते काय?’ गीता बसराने हरभजनसोबत २०१५ मध्ये लग्न केले. हरभजन आणि गीताने जवळपास सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा विचार केला. या दाम्पत्याला जुलै २०१६ मध्ये हिनाया नावाची मुलगी झाली.