Join us

गुरमीत चौधरीने अनोळखी व्यक्तीला दिला सीपीआर

By संजय घावरे | Updated: October 6, 2023 19:46 IST

Gurmeet Chaudhary: छोट्या पडद्यावरील 'रामायण' मालिकेत प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारून घरोघरी लोकप्रिय झालेल्या अभिनेता गुरमीत चौधरीने एका अनोळखी व्यक्तीला सीपीआर देत त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई - छोट्या पडद्यावरील 'रामायण' मालिकेत प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारून घरोघरी लोकप्रिय झालेल्या अभिनेता गुरमीत चौधरीने एका अनोळखी व्यक्तीला सीपीआर देत त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, गुरमीतचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका व्यक्तीला गुरमीत सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळते. याखेरीज तो त्या व्यक्तीचे हृदय आणि डाव्या हाताची नाडी सुरू आहे की नाही हे देखील तपासतो. याच दरम्यान तो रुग्णवाहिका बोलवायलाही सांगतो. तिथे गोळा झालेल्या लोकांच्या मदतीने गुरमीत त्या व्यक्तीला रुग्णालयात हलवण्यासाठीही मदत करतो. गुरतीमच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुरमीतने 'गीत हुई सबसे पराई', 'पुनर्विवाह' या मालिकांसोबतच 'झलक दिखला जा ५', 'नच बलिए ६', 'खतरों के खिलाडी ५' या रिअॅलिटी शोजमध्येही काम केले आहे.

टॅग्स :मुंबई