Join us

दिव्यांका त्रिपाठीच्या या ग्लॅमरस लूकला चाहत्यांचा ना-ना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 16:01 IST

'ये है मोहब्बते' मालिकेत इशीता भूमिकेतून घराघरांत पोहचलेली दिव्यांका त्रिपाठी आज टीव्ही अभिनेत्रींमध्ये लोकप्रिय अभिनेत्री आहे. इशी माँ बनत ...

'ये है मोहब्बते' मालिकेत इशीता भूमिकेतून घराघरांत पोहचलेली दिव्यांका त्रिपाठी आज टीव्ही अभिनेत्रींमध्ये लोकप्रिय अभिनेत्री आहे. इशी माँ बनत तिने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली.मालिकेतील तिच्या भूमिकेप्रमाणेच तिच्या सौदर्यांवरही रसिक फिदा होत असल्याचे पाहायला मिळतेय.मालिकेत नेहमीच साडीत दिसणारी इशी माँ जेव्हा ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळते.तेव्हा मात्र दिव्यांकाच्या फॅशन सेन्सची चांगलीच प्रचिती येते. दिव्यांकाचा एक जुना फोटो सोशल मीडिवायर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून चाहतेही दिव्यांकाला फॅशनचे धडे देताना पाहायला मिळत आहेत. कारण मालिकेत ती साडीत किंवा ट्रेडिशनल लूकच तिला खूप चांगला दिसतो असे काहींनी तिला प्रतिक्रीया देत आपले मत नोंदवले आहे.  कपडे वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल फॅशनच्या बाबतीत अप टू डेट कसं ठेवावं हे दिव्यांकाला फारसे माहिती नसल्याचेही तिचे चाहते सोशल मीडियावर बोलताना दिसतायेत. फोटोत दिव्यांका काळ्या रंगाच्या टायगर प्रिंटसारखा नक्षी काम केलेला वनपिसमध्ये पाहायला मिळत आहे.मात्र हा लूक रसिकांच्या फारसा मनात भरला नसल्यामुळे फॅशनच्या बाबतीत तिला फेलच केल्याचे पाहायला मिळत आहे.दिव्यांकाचे विवेक दहियासह लग्नही खूप चर्चेत राहिले. या दोघांची केमिस्ट्रीही दोघांच्या फॅन्सना भावली.लग्नाच्या वेळी दिव्यांकाच्या प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची रसिकांची उत्सुकता पाहायला मिळाली.8 जुलैला  2016 ला हे रेशीमगाठीत अडकले.या दोघांचे प्रि-वेडींग फोटोशूटलाही खूप पसंती मिळाली.शुभमंगल सोहळ्याआधी समोर आलेल्या दिव्यांका आणि विवेकच्या फोटोशूट तर तुफान हिट ठरलं  हे फोटो कुणालाही प्रेमात पाडतील असेच  होते. हे -वेडिंग फोटोशूट श्रीलंकेत करण्यात आले होते. या फोटोशूटमध्ये दिव्यांकानं बेबी पिंक कलरचा गाऊन परिधान केला होता.तर या गाऊनमध्ये दिव्यांका अगदी एखाद्या परीप्रमाणे दिसत होती. दुसरीकडे गडद रंगाच्या सूटमध्ये विवेकचा डॅशिंग अंदाजही रसिकांना भावला.ये है मोहोब्बते ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील रमण आणि इशिताची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तसेच या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून लीपनंतर या मालिकेच्या कथानकात अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मालिकेने लीप घेतल्यानंतर 'ये है मोहब्बते' या मालिकेचे चित्रीकरण भारतात नव्हे तर परदेशात केले जाणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण आता बूडापेस्टमध्ये होणार असून या मालिकेतील काही कलाकार चित्रीकरणासाठी बूडापेस्टला रवाना देखील झाले आहेत.