Join us

​दिया अडकणार विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 11:09 IST

मिसेस. कौशिक की पाच बहुये या मालिकेत झळकलेली दिया चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दियाचे लंडनमधील राहाणाऱ्या एका व्यवसायिकासोबत ...

मिसेस. कौशिक की पाच बहुये या मालिकेत झळकलेली दिया चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दियाचे लंडनमधील राहाणाऱ्या एका व्यवसायिकासोबत लग्न होणार आहे. दिया ही रोशनी चोप्राची लहान बहीण आहे. रोशनीने कसम से, काव्यांजली, कॉमेडी सर्कस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. दियाचे लग्न होणार असल्याची बातमी रोशनीनेच मीडियाला दिली आहे. रोशनी सांगते, "लंडनमध्ये राहाणाऱ्या रिची मेहतासोबत दियाचा एप्रिलमध्ये साखरपुडा झाला होता. रिची हा एका कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्या दोघांचे लग्न नोव्हेंबरमध्ये होणार असून 24 ते 27च्या दरम्यान लग्न, मेहंदी, डान्स पार्टी यांसारखे विविध समारंभ होणार आहेत."