Join us  

गिरीश ओक यांची मुलगीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याविषयी खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 12:57 PM

गिरीश ओक यांच्या प्रमाणे त्यांची मुलगीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या भूमिकेतून रसिकांचे मनोरंजन करत असते. हिंदी असो किंवा मराठी सिनेसृष्टीत तिने आपल्या अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

भारदस्त आवाज आणि चोखंदळ तसंच हरहुन्नरी अभिनेता म्हणून डॉ. गिरीश ओक यांची ओळख. यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. बस नाम ही काफी है असे त्यांच्याबद्दल म्हणणे चुकीचे ठरणार नाही. इतकी त्यांची लोकप्रियता आहे. आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवलाय. सध्या 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत अभिजित राजे या भूमिकेत झळकत आहे. त्यांचीही भूमिका रसिकांना प्रचंड आवडली आहे. रिल लाईफमध्ये रसिकांचे भरघोस मनोरंजन करणारे गिरीश ओक यांच्या  खासगी आयुष्याबद्दल मात्र खूप कमी जणांना माहित आहे. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही रसिकांना जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता असते.

गिरीश ओक यांच्या प्रमाणे त्यांची मुलगीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या भूमिकेतून रसिकांचे मनोरंजन करत असते. हिंदी असो किंवा मराठी  सिनेसृष्टीत  तिने आपल्या अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अभिनेत्री आहे गिरीजा ओक.वयाच्या 15 वर्षापासूनच गिरिजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 

अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमात ती झळकली आहे.'लज्जा' ही मराठी मालिका तसेच 'लेडीज स्पेशल' या हिंदी मालिकेत गिराजीने साकारलेल्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली होती. छोटा पडदाच नाही तर मराठी सिनेमांप्रमाणे हिंदी सिनेमातही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.आमिर खानसोबत 'तारे जमीन पर' सिनेमातही ती झळकली आहे. जाहिराती, मालिका, सिनेमा, नाटक यानंतर गिरीजा शॉर्टफिल्मच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत असते.

 सोशल मीडियावरही गिरीजा सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. आपले खास फोटो व्हिडीओ ती चाहत्यांसह शेअर करत असते.गिरीजाने 2011 मध्ये सुहरूद गोडबोलेसह लग्न करत आपल्या आयुष्याची सुरुवात केली. या दोघांना एक मुलगाही आहे.

कबीर असे मुलाचे नाव आहे. कबीरसोबतचे खास फोटोही गिरीजा चाहत्यांसह शेअर करत असते.  विशेष म्हणजे  गिरीजाच्या वडिलांप्रमाणे सासरेही प्रसिद्ध आहेत. श्रीरंग गोडबोले यांची गिरीजा सून आहे. 

टॅग्स :गिरिजा ओकगिरिश ओक