‘थुकरटवाडी’तील विनोदवीरांची परदेशवारी,लंडन पॅरिसमधील धम्माल मस्तीचे फोटो श्रेया बुगडेनं केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 13:36 IST
छोट्या पडद्यावरील रसिकांना खळखळून हसवणारा आणि दिलखुलास मनोरंजन करणारा शो म्हणजे चला हवा येऊ द्या. अल्पावधीतच हा शो रसिकांचा ...
‘थुकरटवाडी’तील विनोदवीरांची परदेशवारी,लंडन पॅरिसमधील धम्माल मस्तीचे फोटो श्रेया बुगडेनं केले शेअर
छोट्या पडद्यावरील रसिकांना खळखळून हसवणारा आणि दिलखुलास मनोरंजन करणारा शो म्हणजे चला हवा येऊ द्या. अल्पावधीतच हा शो रसिकांचा लाडका शो बनला. शोमधील विनोदवीरांनी थुकरटवाडीत अशी काही धम्माल केली की ती रसिकांना भावली. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, डॉ. निलेश साबळे आणि श्रेया बुगडे या विनोदवीरांच्या एकाहून एक सरस परफॉर्मन्सनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.मात्र काही दिवसांपूर्वी रसिकांना हसवणारा हा लाडका शो काही काळासाठी बंद झाला आहे. सध्या चला हवा येऊ द्या या शोच्या जागी सूरेल सारेगमपा हा शो रसिकांच्या भेटीला आला आहे. अल्पविराम घेऊन चला हवा येऊ द्या या शोची टीम परदेशवारीवर गेली आहे. लंडन, पॅरिसमध्ये चला हवा येऊ द्या शोच्या टीमनं धम्माल मस्ती केली. या ठिकाणी विविध स्टेज शो या टीमनं केले आहेत. परदेश दौरा असल्यावर धम्माल मस्ती तर होणारच. त्यातच परदेशवारीवर गेलेली टीम चला हवा येऊ द्या या शोची टीम असेल तर तुफान धम्माल मस्ती तर नक्कीच ठरलेलीच नाही का ? आपल्या लौकिकाला साजेशी धम्माल चला हवा येऊ द्या शोच्या विनोदवीरांनी परदेशात अनुभवली. चला हवा येऊ द्या शोमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रत्येक विनोदवीर हसवत असतो. या विनोदवीरांमध्ये श्रेया बुगडेही काही मागे नाही. तीसुद्धा शोमध्ये कधी श्रीदेवीची मिमिक्री करते तर कधी हटके भूमिका साकारुन रसिकांचं मनोरंजन करते.अशीच धम्माल श्रेयानं परदेश दौ-यातही केली.छोट्या पडद्यावर रसिकांना हसवणा-या श्रेयानं ही परदेशवारी बरीच एन्जॉय केली. यावेळी विविध कलाकारांची मिमिक्री करत परदेशातील आपल्या फॅन्सचं मनोरंजन केलं. यावेळी श्रेया आणि टीमनं पॅरिसच्या प्रसिद्ध अशा आयफेल टॉवरलाही भेट दिली. याशिवाय लंडन आणि पॅरिसमधील विविध ठिकाणी जात चला हवा येऊ द्या शोच्या टीमनं परदेशवारीचा मनमुराद आनंद लुटला.याच परदेशवारीचे विविध फोटो श्रेयानं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.