तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच सगळे सण साजरे केले जातात. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नुकतेच या मालिकेत ध्वजारोहणही करण्यात आले. हे ध्वजारोहण अब्दुलच्या हस्ते करून जात-धर्म असा भेदभाव करू नये असा संदेश मालिकेद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीच्या मते केवळ स्वातंत्र्यदिनीच नव्हे तर आपण रोजच देशासाठी शहीद झालेल्या लोकांचे स्मरण करणे गरजेचे आहे. तसेच देशात सगळीकडे स्वच्छता राखली पाहिजे आणि आपला देश भ्रष्टाचारमुक्त झाला पाहिजे यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे.
तारकमध्ये ध्वजारोहण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 12:30 IST