Join us  

​बिग बॉसच्या आजवरच्या सिझनमध्ये पहिल्यांदाच घडली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 5:23 AM

बिग बॉसचे आवजरचे सगळे सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमातील स्पर्धक, सलमान खानचे सूत्रसंचालन या सगळ्याच गोष्टींची नेहमीच चर्चा केली ...

बिग बॉसचे आवजरचे सगळे सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमातील स्पर्धक, सलमान खानचे सूत्रसंचालन या सगळ्याच गोष्टींची नेहमीच चर्चा केली जाते. सध्या बिग बॉसचा ११ वा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा सिझन आजवरच्या सिझनमधील सगळ्यात वादग्रस्त सिझन आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात जुबैर खान या स्पर्धकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्येसाठी त्याने सलमान खानला जबाबदार धरले. सलमान खान विरोधात त्याने तक्रार देखील नोंदवलेली आहे. बिग बॉसच्या या सिझनमध्ये वेगवेगळ्या गोष्टीच पाहायला मिळत आहेत. आता या सिझनमध्ये आणखी एक विचित्र गोष्ट घडली आहे. बिग बॉसच्या आजवरच्या सगळ्या सिझनमध्ये ही गोष्ट पहिल्यांदाच घडली असल्याने या गोष्टीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ढिंचॅक पूजा ही तिच्या गाण्यांसाठी प्रचंड फेमस आहेत. युट्युबवरील तिची सगळीच गाणी लोकांनी डोक्यावर घेतली आहेत. पूजाची लोकप्रियता पाहाता तिला यंदाच्या बिग बॉस सिझनमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री देण्यात आली आहे. पण पूजा घरात गेल्यानंतर काहीच तासात एका वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.पूजा घरात गेल्यानंतर सगळ्यांशी गप्पा मारत असताना हितेन तेजवानीला तिच्या डोक्यात उवा आणि लिखा असल्याचे लक्षात आले. त्याने ही गोष्ट लगेचच इतर स्पर्धकांना सांगितली. त्यावर सगळ्याच स्पर्धकांनी तिच्या केसांचे निरीक्षण केले. त्यावर तिच्या डोक्यात उवा असल्याचे सगळ्यांनाच दिसले. त्यावर हितेन तेजवानीने पूजासाठी बिग बॉसकडून उवा मारण्याचे औषध देखील मागितले. बिग बॉसचे आजवर दहा सिझन झाले आहेत आणि या प्रत्येक सिझनमध्ये अनेक सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पण आजवर कधीच कोणत्या स्पर्धकाच्या डोक्यात उवा दिसल्या असल्यामुळे बिग बॉसच्या घरात चर्चा रंगली नव्हती. पण आता या सगळ्यामुळे पूजाला बिग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांकडून वागणूक कशी मिळते हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. Also Read : मैत्रिणीबरोबर अश्लीलपणा करताना दिसली आर्शी खान, व्हिडीओ व्हायरल!