ही पाहा करणवीरच्या मुलींची पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 17:42 IST
नागिन 2 या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा करणवीर सध्या सातवे आसमान पे आहे. कारण त्याच्या पत्नीने नुकत्याच दोन जुळ्या ...
ही पाहा करणवीरच्या मुलींची पहिली झलक
नागिन 2 या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा करणवीर सध्या सातवे आसमान पे आहे. कारण त्याच्या पत्नीने नुकत्याच दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. त्या दोघींचा फोटो त्याने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगला शेअर केला आहे. करणवीरने सध्या त्याच्या मालिकेच्या चित्रीकरणातून ब्रेक घेतला असून तो सगळा वेळ आपल्या पत्नीला आणि मुलीला देत आहे. करणने या फोटोसोबत त्याच्या मुलींविषयी अतिशय सुंदर गोष्टी लिहिल्या आहे. त्याने म्हटले आहे की, "दोन पऱ्या माझ्या आयुष्यात आल्या आहेत. या दोघींनी माझ्या डोळ्यात पाहिल्यानंतर मी सगळे काही विसरून जातो. त्यांना भूक लागली अथवा मी त्यांना उचलावे असे त्यांना वाटत असेल तर त्या मोठ्या मोठ्याने रडायला लागतात. मग मी उचलून घेतल्यावर त्या दोघी लगेचच शांत होतात. त्यांना एकदा हातात घेतले की खाली ठेवावे असे मला वाटतच नाही. त्यांच्याकडे बघतच बसावे, त्यांच्यासोबत गप्पा माराव्यात असे मला वाटते. त्यांच्यासाठी रात्रभर जागण्याचीदेखील माझी तयारी आहे. त्या दोघींनी आता जसा माझा हात पकडला आहे तसाच आयुष्यभर पकडा असेच मी त्यांना सांगतो." करणवीरने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्या दोघींचे केवळ हात आपल्याला दिसत आहेत. पण लवकरच तो आपल्या मुलींचे फोटो शेअर करेल अशी त्याच्या फॅन्सना आशा आहे. करणची पत्नी तिजय सिंधू ही मुळची कॅनडाची आहे. तिचे कुटुंबदेखील तिथेच स्थायिक असल्याने तिने तिच्या बाळांना कॅनडात जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या करणवीरदेखील कॅनडात आहे.