Join us  

सेजल शर्माच्या निधनानंतर या अभिनेत्रीला झालाय मनस्ताप, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 5:10 PM

सेजल शर्मा या अभिनेत्रीने काल राहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देसेजल शर्मा नावाच्या दोन अभिनेत्री छोट्या पडद्यावर काम करत असल्याने कोणत्या सेजल शर्माचे निधन झाले हा प्रश्न लोकांना पडला आहे. अनेकांनी दुसऱ्या सेजल शर्माच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर जाऊन तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माने तिच्या राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सेजल मीरा रोड येथे तिच्या दोन रूम मेट सोबत राहात होती.

सेजल शर्मा नावाच्या दोन अभिनेत्री छोट्या पडद्यावर काम करत असल्याने कोणत्या सेजल शर्माचे निधन झाले हा प्रश्न लोकांना पडला आहे. अनेकांनी दुसऱ्या सेजल शर्माच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर जाऊन तिला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सेजलच्या ओळखीचे अनेकजण तिला कालपासून फोन करून तिची खुशाली विचार आहेत. अखेरीस सेजलने ट्वीट करत सांगितले आहे की, मी माझ्या चाहत्यांना आणि शुभचिंतकांना सांगू इच्छिते की, मी अगदी व्यवस्थित आहे. सेजलच्या निधनामुळे मला देखील धक्का बसला आहे. मी सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की, तुमच्या आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी अशाप्रकारचे पाऊल उचलू नका... आत्महत्या केल्याने कोणतेही समस्या सुटत नाही. मीडियामध्ये देखील सेजलऐवजी माझे फोटो वापरण्यात आले आहेत. हे अतिशय चुकीचे आहे. यामुळे माझ्या जवळच्या व्यक्तींना धक्का बसला आहे. 

काशमिरा पोलिस स्थानकात सेजलच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून तिच्या खोलीत राहाणाऱ्या दोन मुलींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पाच वाजता पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सेजलला पाहाण्यात आले. सेजलच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट सापडली असून तिने यात आत्महत्येमागचे कारण लिहिले आहे. तिच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरविले जाऊ नये असे तिने सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. सेजल ही केवळ 26 वर्षांची होती. तिने स्टार प्लसवरील दिल तो हॅपी है जी या मालिकेत काम केले होते.

मीरा रोड येथील शिवार गार्डन परिसरातील रॉयल नेस्ट हाऊसिंग सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर गेल्या काही महिन्यांपासून सेजल भाड्यावर राहात होती. दिल तो हॅपी है जी ही तिची मालिका जानेवारी 2019 ला सुरू झाली होती. पण अचानक ऑगस्टला ही मालिका बंद करण्यात आली. या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत होती. तिच्या काही मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार, मालिका बंद झाल्यानंतर सेजल प्रचंड तणावाखाली होती. ती गेल्या काही महिन्यांपासून काम शोधत होती. पण काही केल्या तिला काम मिळत नसल्याने ती निराश झाली होती.

सेजल ही मुळजी राजस्थानमधील उदयपूर येथील होती. अभिनयक्षेत्रात करियर करण्यासाठी 2017 मध्ये ती मुंबईत आली होती. दिल तो हॅपी है जी ही तिची पहिलीच मालिका होती. याआधी तिने काही जाहिरातींमध्ये काम केले होते.

टॅग्स :टेलिव्हिजन