फॅनची इच्छा रिअॅलिटी शोमुळे पू्र्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:32 IST
सुपर डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये सध्या शिल्पा शेट्टी परीक्षकाची भूमिका साकारत आहे. शिल्पा शेट्टी बॉलिवुडमध्ये अनेक वर्षांपासून आहे. तिच्या ...
फॅनची इच्छा रिअॅलिटी शोमुळे पू्र्ण
सुपर डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये सध्या शिल्पा शेट्टी परीक्षकाची भूमिका साकारत आहे. शिल्पा शेट्टी बॉलिवुडमध्ये अनेक वर्षांपासून आहे. तिच्या अभियासोबतच तिच्या नृत्याचेदेखील अनेक फॅन्स आहेत. सुपर डान्सर या कार्यक्रमाच्या ऑडिशनमध्ये पंचम भगवती या मुलाने त्याच्या नृत्याद्वारे परीक्षकांचे मन जिंकले. पंचमला या कार्यक्रमात येण्यासाठी त्याचे वडील विकास भगवती यांनी प्रोत्साहन दिले. विकास हे शिल्पा शेट्टीचे खूप मोठे फॅन आहेत. या कार्यक्रमामुळे त्यांना शिल्पा शेट्टीला भेटला येईल हे त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला पंचमला या कार्यक्रमात भाग घेण्यास सांगितले. आपल्या या फॅनला भेटून शिल्पा खूपच खूश झाली असे ती सांगते.