Join us  

ही प्रसिद्ध अभिनेत्री होती कुशल पंजाबीची EX- गर्लफ्रेंड, त्याच्या मृत्यनंतर केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 12:54 PM

कुशलच्या आयुष्यात युरोपियन Audrey Dolhen हिच्याशी अफेअर सुरु झाले आहे. आणि 2015 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवीन सुरूवात केली.

37 वर्षीय या अभिनेत्यानं नैराश्यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. कुशलच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यानं आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं म्हटलं आहे. पण कुशलचे नातेवाईक मात्र या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. त्यानंतर आता त्याची एक्स गर्लफ्रेंडनं सुद्धा याविषयी दुःख व्यक्त केलं. कुशलच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. विशेष म्हणजे कुशलचे सर्वात आधी अभिनेत्री मेघना नायडूबरोबर अफेअर होते.  

'कलियों का चमन' या गाण्यामुळे मेघना प्रकाशझोतात आली होती. मेघनाने 2 वर्षाआधी पुर्तगाली टेनिस प्लेयर लुइस मिगुएल रीससह गपचुप लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती. मात्र आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. कुशल पंजाबीच्या आत्महत्येची बातमी ऐकताच तिनेही दुःख व्यक्त केले आहे. तिने म्हटले आहे की,  कुटुंब आणि मुलासाठी खूप वाईट वाटतं. या कठीण परिस्थितीशी सामना करण्याची ताकद देव त्यांना देवो एवढीच आशा मी व्यक्त करेन.'  कुशल असे टोकाचे पाऊल उचलेले असे स्वप्नातही वाटले नसल्याचे तिने म्हटले आहे.  

'2010 मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर ती त्याला कधी भेटली होती.कुशलचे आणि मेघनाचे ब्रेकझाल्यानंतर ती त्याला कधीच भेटली नाही. मेघना नंतर कुशलच्या आयुष्यात युरोपियन  Audrey Dolhen हिच्याशी अफेअर सुरु झाले आहे. आणि 2015 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवीन सुरूवात केली.

 

कुशालने इंडस्ट्रीमध्ये एक डान्सर आणि मॉडेल म्हणून आपले पाऊल टाकले होते. त्याने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात 1995 मध्ये आलेल्या 'अ माउथ फुल ऑफ स्काय' ने केली होती. त्यानंतर तो 'लव्ह मॅरेज', 'कसम से', 'देखो मगर प्यार से', 'डॉन' यांसह अनेक सीरियल्समध्ये दिसला. कुशाल बॉलिवूडच्याही अनेक सिनेमांमध्येही झळकला आहे.

 

टॅग्स :कुशल पंजाबी