Join us

शरद दिव्यांकाच्या मदतीला धावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 12:44 IST

शरद मल्होत्रा आणि दिव्यांका त्रिपाठी 10 वर्षांपासून नात्यात होते. पण गेल्या वर्षीं त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दिव्यांकाने ...

शरद मल्होत्रा आणि दिव्यांका त्रिपाठी 10 वर्षांपासून नात्यात होते. पण गेल्या वर्षीं त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दिव्यांकाने नुकतेच विवेक दहियाशी लग्न केले तर शरद पूजा बिश्ट या अभिनेत्रीसोबत नात्यात असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी शरदच्या एका फॅनने दिव्यांकाला विवेकसोबत लग्न करण्यावरून एका सोशल नेटवर्किंग साईटवर अतिशय वाईट शब्दांत सुनावले होते. त्यावर दिव्यांकाने शरदला मेसेज करून तुझ्या अशा फॅन्सना समजव असे म्हटले होते. त्यावर शरदने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर महिलांचा मान राखू न शकणारे लोक माझे फॅन्स असू शकत नाहीत असे पोस्ट केले आहे. शरदने दिलेला हा पाठिंबा पाहाता दिव्यांका खूप खूश झाली आहे. यासाठी तिने शरदचे आभारही मानले आहेत.