Exclusive : विघ्नहर्ता गणेश या मालिकेत उझैर बसर बनणार छोटा गणेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 16:16 IST
गणपती बाप्पाच्या आयुष्यावर अनेक मालिका आजवर आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. गणेशाच्या आयुष्यावर गणपती बाप्पा ही मराठी मालिका सध्या सुरू ...
Exclusive : विघ्नहर्ता गणेश या मालिकेत उझैर बसर बनणार छोटा गणेश
गणपती बाप्पाच्या आयुष्यावर अनेक मालिका आजवर आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. गणेशाच्या आयुष्यावर गणपती बाप्पा ही मराठी मालिका सध्या सुरू असून ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आता गणपती बाप्पाच्या आयुष्यावर आणखी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही एक हिंदी मालिका असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या मालिकेत शंकर, पार्वती आणि गणेश या भूमिका अधिक महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या भूमिकांसाठी खूप चांगल्या कलाकारांचा शोध मालिकेच्या टीमने घेतला आहे. विघ्नहर्ता गणेश असे या मालिकेचे नाव असून या मालिकेत प्रेक्षकांना गणपती बाप्पाच्या लहानपणापासूनचा प्रवास पाहाता येणार आहे. या मालिकेचा सेट हा खूप भव्य असून या मालिकेच्या चित्रीकरणासाठी खूप वेगवेगळ्या कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.विघ्नहर्ता गणेश या मालिकेत बाल गणेशाची भूमिका महत्त्वाची असल्याने ही भूमिका साकारण्यासाठी अनेक कलाकारांचा विचार करण्यात आला होता. या भूमिकेसाठी अनेक ऑडिशनदेखील घेण्यात आले होते आणि आता ऑडिशन्समधून या मालिकेत बाल गणेशाची भूमिका साकारण्यासाठी उझैर बसरची निवड करण्यात आली आहे.उझैर बसरने याआधी देखील अनेक पौराणिक मालिकेत काम केले आहे. तो सिया के राम या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने लवची भूमिका साकारली होती. या त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. तसेच त्याने सूर्यपुत्र करण या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. उझैर बसर या मालिकेसाठी चांगलीच तयारी करत आहे.