Join us

Exclusive : ​कॉमेडीची बुलेट ट्रेन घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 17:36 IST

स्टँडअप कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडीची बुलेट ट्रेन हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना अनेक ...

स्टँडअप कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडीची बुलेट ट्रेन हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना अनेक विनोदवीर पाहायला मिळाले होते. या कार्यक्रमात महेश कोठारे आणि सोनाली कुलकर्णी परीक्षकाची भूमिका साकारत आहेत तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करत आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन प्रेक्षकांचा निरोप घेणार ही त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच वाईट बातमी आहे.  कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांना त्यांच्या अतरंगी, खुशखुशीत विनोदशैलीने पोट धरून हसवले. हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच ठरला होता. या कार्यक्रमामधील खुसखुशीत, बेधडक, बिनधास्त, अतरंगी विनोद्शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसण्यास भाग पाडले. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली. कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमाच्या मंचावर विवेक ऑबेरॉय आणि रितेश देशमुखसारखे कलाकारदेखील त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. या कार्यक्रमातील नम्रता आवटे, रोहित पवार आणि योगेश शिरसाट यांसारखे कलाकार तर प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या कलाकारांना प्रेक्षकांचे अपार प्रेम लाभले आहे. या कार्यक्रमात काही भागांपूर्वी विनोदवीरांनी प्रख्यात विनोदीनटांना मानवंदना दिली होती. भारतामधील आणि भारताबाहेरील प्रख्यात विनोदवीर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांच्या विनोदशैलीचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत असे चार्ली चाप्लीन तसेच संपूर्ण भारताला आपल्या विनोदाने वेड लावले असे दादा कोंडके, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे, आपल्या अनोख्या विनोदशैलीसाठी आणि आपल्या मालवणी बोलीसाठी सुप्रसिद्ध असलेले मच्छिंद्र कांबळी तसेच वगनाट्यासाठी प्रसिद्ध असलेले काळू-बाळू या भावांची जोडी यांना ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ मधील कलाकारांनी मानवंदना दिली होती.Also Read : सोनालीला मिळाले खास बर्थ डे गिफ्ट!