संपूर्ण टीम ब्रेकवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 12:43 IST
झी मराठीवर रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांनी या मालिकेला चांगलेच डोक्यावर ...
संपूर्ण टीम ब्रेकवर
झी मराठीवर रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांनी या मालिकेला चांगलेच डोक्यावर घेतले आहे. या मालिकेचे सगळे चित्रीकरण हे सावंतवाडीला होते.त्यामुळे सध्या या मालिकेची संपूर्ण टीम सावंडवाडी येथे ठाण मांडून बसली आहे. या मालिकेचे नुकतेच ५० भागांचे चित्रीकरण करून पूर्ण झाले आहे. त्यामुळे सगळ््या टीमला काही दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. सगळीच टीम सध्या आपापल्या घरी गेली आहे. काहींनी कुटुंबियांसोबत फिरायला जाणे पसंत केले आहे.