Join us

​रिंकू राजगुरूचे हे स्वप्न झाले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 10:57 IST

झी टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळे सिझन प्रेक्षकांनी ...

झी टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळे सिझन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. या कार्यक्रमाने आजवर बॉलिवूडला खूप चांगले डान्सर मिळवून दिले आहेत. धर्मेश पालांडे, सलमान युसूफ खान, शक्ती मोहन, पुनित पाठक, राघव जुयाल, सनम जोहर यांसारख्या डान्सरने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाद्वारे केली आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक चांगले परफॉर्मन्स सादर करत असून या सगळ्यातून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. डान्स इंडिया डान्सच्या आगामी भागामध्ये सुपरहिट मराठी चित्रपट सैराटमधील कलाकार विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत.सैराट या चित्रपटामधील प्रमुख कलाकार रिंकू राजगुरू, तानाजी गालगुंडे आणि अरबाझ शेख यांनी या खास एपिसोडसाठी नुकतेच चित्रीकरण केले. या सगळ्यांचा या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. त्यांनी केवळ स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस पाहिले नाहीत तर त्यांच्यासाठी चीअर करून त्यांचा उत्साह देखील वाढवला.रिंकू तर ग्रॅन्डमास्टर मिथुन चक्रवर्ती यांना पाहून थक्कच झाली होती. त्यांच्यासोबत एका मंचावर उभे राहणे हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे असे तिने सांगितले. या शोमध्ये आलेल्या आपल्या अनुभवाबद्दल रिंकू सांगते, “मी शाळेत असल्यापासून डान्स इंडिया डान्स पाहत आले आहे. या शो ची मी जबरदस्त चाहती असून इथे दर आठवड्‌याला स्पर्धक साकारत असलेले परफॉर्मन्स मला अतिशय आवडतात. मिथुनदांना एकदा भेटून त्यांच्यासोबत डान्स करण्याचे माझे स्वप्न होते. आमच्यासाठी ते देशातील अल्टिमेट डिस्को डान्सर आहेत. त्यांच्यासोबत डान्स करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. माझ्यासाठी हा दिवस खूपच स्पेशल ठरला.”डीआयडीच्या मंचावर सैराट चित्रपटातील सहकलाकारांसोबत झिंगाट गाण्यावर मिथुनदांसोबत रिंकूचे नाचण्याचे स्वप्न पूर्ण झाले. डिस्को डान्सरने झिंगाटच्या तालावर मस्त डान्स केला. या सगळ्याच कलाकारांनी या कार्यक्रमात खूप एन्जॉय केले. Also Read : सैराट फेम रिंकू राजगुरूच्या आगामी चित्रपटाचे नाव तुम्ही ऐकले का?