Join us

सर्जा लग्नाला हो म्हणेल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 15:23 IST

चाहुल या मालिकेत निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य शांभवी आणि सर्जाला कळता कळता राहून गेले आणि पुन्हा एकदा शांभवी निर्मलाच्या जाळ्यात ...

चाहुल या मालिकेत निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य शांभवी आणि सर्जाला कळता कळता राहून गेले आणि पुन्हा एकदा शांभवी निर्मलाच्या जाळ्यात अडकली. या सगळ्या घटना होत असतानाच शारदा म्हणजे सर्जाच्या आईला त्याच्या लग्नाची घाई लागली आहे, तिने सर्जासाठी मुली बघायला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे निर्मला प्रंचड संतापली आहे. कारण पहिले जेनी, नंतर शांभवी आणि आता कोण ही नवीन हा प्रश्न तिला सतत त्रास देतो आहे. शारदाने सर्जासाठी माया नावाची मुलगी जानकीच्या मदतीने पसंत केली आहे. मायाचा रोल स्वप्नाली पाटील साकारणार आहे.सर्जाच्या आत्याने जानकीने मायाला पसंत केले आहे. पण खरतर माया ही स्ट्रग्लर आर्टिस्ट आहे, आणि जे जानकीला माहिती आहे. आता प्रश्न हा पडतो कि, जानकी आणि मायाच या सगळ्यामध्ये काय कारस्थान आहे ? माया नामक मुलगी खास मुंबईहून सर्जाला भेटण्यासाठी आली आहे. कारण तिच अस मत आहे कि, ज्या मुलाशी ती लग्न करणार आहे त्याला भेटल्याशिवाय कस काय हो म्हणायचं आणि याबरोबरच त्याच्या कुटुंबांला भेटणे देखील तितकच महत्वाच आहे असे तिला वाटते. माया सर्जाला भेटते त्याच्या कुटुंबाला देखील भेटते आणि भोसले वाड्यात रहायला देखील लागते. पण हळूहळू शांभवीला मात्र कुठेतरी त्यांच्यातील मैत्री खटकू लागते. शांभवीला अस का होत आहे हे तिला नेमक काही कळत नाही. शांभवीला प्रेमाची चाहूल लागली आहे पण याची जाणीव तिला कधी होईल ? हे बघणे रंजक ठरेल.