विद्याला तिच्या आईने बनवलेला हा पदार्थ खायला आवडतो? या कारणांमुळे विद्याला जेवण बनवता येत नाही?जाणून घ्या काय आहे ती कारणं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 16:18 IST
आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांचे मनात घर करणारी अभिनेत्री विद्या बालनचे आणखी एक कलाकौशल्य छोट्या पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे. ...
विद्याला तिच्या आईने बनवलेला हा पदार्थ खायला आवडतो? या कारणांमुळे विद्याला जेवण बनवता येत नाही?जाणून घ्या काय आहे ती कारणं?
आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांचे मनात घर करणारी अभिनेत्री विद्या बालनचे आणखी एक कलाकौशल्य छोट्या पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे. लवकरच मास्टर शेफचे 5 पर्व या कार्यक्रमात ती हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात ज्या प्रकारे स्पर्धकांचा वेगवेगळे पदार्थ बनवतांना कस लागतो त्याचप्रकारे आता विद्या बालनचाही एक रेसिपी बनवताना कस लागणार हे मात्र नक्की.कारण विद्याला फक्त जेवणाची आवड आहे, वेगवेगळे पदार्थावर ताव मारायलाही तिला आवडते. मात्र तिला जेवण बनवण्याची आवडही नाही आणि तिला जेवण बनवताही येत नाही.त्यामुळे तिने मास्टर शेफ या कार्यक्रमात सगळ्यात सोपी रेसिपीची निवड केली. ऑम्लेट बनवणे सोपे असल्यामुळे तिने ऑम्लेट बनवत अखेर तिला मिळालेला टास्क तिने पूर्ण केला.विद्याला तिच्या आईच्याने बनवेला दही भात खूप आवडत असल्याचे सांगायलाही ती विसरली नाहीय.मास्टरशेफच्या स्पर्धकांना प्रोत्साहन देताना ती म्हणाली,''मास्टरशेफमध्ये सहभागी झालेले सगळे स्पर्धक जबरदस्त आहेत.त्यातून विविधतेतून एकात्मता दिसून येते.देशभरातील कानाकोप-यातील लोक या मंचावर येवून आपली पाककला दाखवतात भन्नाट कल्पना असल्याचेही विद्या यावेळी भरभरून बोलत होती. नुकताच विद्या बालन कहानी 2 हा सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकला आहे. कहानी 2 सिनेमाच्या प्रमोशनसाठी विद्या वेगेवगळ्या कार्यक्रमांत हजेरी लावत होती. विद्याला नेहमी वेगगेळ्या गोष्टी करत सिनेमाचे प्रमोशन करायला आवडते. त्यासाठीच तिने कधीही न केलेले टास्क घेत सिनेमाचे प्रमोशन मास्टर कार्यक्रमात केल्याचे पाहायला मिळाले. याआधी सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती कधी रिक्षातून फिरली तर कधी तिने वॉन्टेड बनलत स्वतःचे पोस्टर मुंबईतील भींतवर लावले तर कधी विनामेकअप लोकांच्या गर्दीत फिरताना विद्या दिसली. अशा गोष्टी करण्यात लेगळीच मजा असल्याचे विद्याने यावेळी सांगितले. प्रमोशनच्या निमित्ताने का होईना चाहत्यांच्याशी कनेक्ट होता येते, त्यामुळे पुन्हा एकदा छोटा पडद्यावळ झळकणे एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे विद्याने सांगितले. जेवन बनवणे जितके विद्याला कठीण वाटत असले तरीही वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारणे आवडत असल्याचे तिने म्हटले आहे.