Join us

​एक्कावन मालिकेतील नमिष तनेजाचा शिव अवतार तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 12:19 IST

एक्कावन ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावत ...

एक्कावन ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावत आहेत. या मालिकेची संकल्पना ही आजच्या इतर मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या मालिकेतील नायिका ही टॉम बॉय असून तिच्या जन्मानंतर लगेचच तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिचे वडील, काका, मामा आणि आजोबा यांनी मिळून तिचा सांभाळ केला आहे. या मालिकेत प्राची तेहलान मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या आधी तिने दिया और बाती या मालिकेत काम केले होते. एक्कावन या मालिकेतील प्राचीच्या भूमिकेचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे.एक्कावन या मालिकेत नमिष तनेजा एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता नमिषचा एक नवा अवतार प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत नमिष तनेजा म्हणजेच सत्या कॉलेजमधील स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी भगवान शिव यांचे रूप धारण करणार आहे. एवढेच नव्हे तर तो तांडवही करणार आहे. नमिष शिव यांचे रूप धारण करण्यासाठी खूप उत्सुक आहे. याविषयी तो सांगतो, “मी लहान असताना रामलीलामध्ये कृष्ण आणि राम साकारायचो. दरवर्षी शिवाचे रूप पाहून मी विस्मयचकित व्हायचो. मला शिवाची भूमिका करण्याची संधी द्या असे मी आयोजकांना नेहमी सांगायचो. पण त्यांनी मला ती संधी कधीच दिली नाही. अखेर खूप प्रतीक्षेनंतर मला शिव यांचे रूप धारण करायला मिळाले आहे. लहान असताना मला जे करायचे होते, ते मला आता करायला मिळत असल्याचा मला आनंद होत आहे. भगवान शिवची भूमिका साकारण्यास मी खूप उत्सुक आहे.”निळा रंग असलेल्या भगवान शिवच्या अवतारात शिरण्यासाठी नमिषला जवळजवळ अडीच तास तरी मेकअप करायला लागतो. पण मेकअप करत असताना तो थकण्यापेक्षा जास्त उत्साही असल्याचे दिसून येत असल्याचे या टीममधील सदस्य सांगतात. मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना नमिष तनेजाचे हे नवे रूप पाहायला मिळणार आहे. Also Read : ​या कारणामुळे अभिनयक्षेत्राकडे वळलीः प्राची तेहलान