नच बलिये फेम अबिगेल पांडे आणि सनम जोहरचे व्हेकेशन फोटो तुम्ही पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 11:31 IST
नच बलिये फेम अबिगेल पांडे आणि सनम गोव्यात एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवत आहेत. त्यांच्या या व्हेकेशनचे फोटो नुकतेच सनमने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
नच बलिये फेम अबिगेल पांडे आणि सनम जोहरचे व्हेकेशन फोटो तुम्ही पाहिलेत का?
नच बलिये या कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमाचे विजेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. या कार्यक्रमाच्या अंतिम तीन स्पर्धकांमध्ये सान्या इराणी-मोहित सेहगल, सनम जोहर-अबिगल पांडे, दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहिया हे होते. या तिघांमधून दिव्यांका आणि विवेकने नच बलियेच्या ट्रॉफीवर त्यांचे नाव कोरले. दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाला नुकतेच वर्षं झाले आहे. त्याचसोबत नच बलियेचे विजेतेपदही त्यांना आताच मिळाले आहे. या दोन्ही गोष्टींचे सेलिब्रेशन करण्यासाठी ते नुकतेच युरोपला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबतच नच बलियेची आणखी एक जोडी सध्या व्हेकेशनवर गेली आहे. नच बलिये या कार्यक्रमात सनम जोहर-अबिगल पांडे हे रनर अप ठरले होते. नच बलिये या कार्यक्रमासाठी ते गेल्या कित्येक महिन्यांपासून मेहनत घेत आहेत. त्यामुळे आता कार्यक्रम संपल्यावर ते व्हेकेशनवर गेले आहेत. ते सध्या गोव्यात असून एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवत आहेत. सनमने त्यांच्या व्हेकेशनचे खूप सारे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा आहे. या फोटोंना खूप साऱ्या लाईक्स मिळत असून अनेकांनी या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोंमध्ये सनम आणि अबिगलची खूप छान केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळत आहे. नच बलिये या कार्यक्रमाच्या दरम्यान देखील प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री खूपच आवडली होती. यामुळे सनम आणि अबिगल ही प्रेक्षकांची आवडती जोडी बनली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यानच सनमने अबिगलला अंगठी घालून प्रपोज केले होते. सनमने पोस्ट केलेल्या फोटोमुळे ते दोघे हॉट कपल असल्याचे त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. IAlso Read : दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया युरोपमध्ये सेलिब्रेट करताहेत लग्नाचा पहिला वाढदिवस