Join us  

ओळखा पाहू? फोटोत निरागस दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखलंत का?, टेलिव्हिजनवरील आहे लाफ्टर क्वीन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 2:58 PM

या अभिनेत्रीची सर्वाधिक चर्चा तिच्या हसण्यामुळे होते.

बॉलिवूड स्टार्सचे फोटो अनेकदा डिजिटल जगात व्हायरल होतात, मात्र त्यांच्या लहानपणीच्या फोटोंना सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. बी-टाउन सेलेब्स अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचे थ्रोबॅक फोटो शेअर करून प्रसिद्धी झोतात येतात, जे त्यांचे चाहते मोठ्या उत्साहाने पाहतात. आता आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचे चित्र सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. हा फोटो पाहून त्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाला ओळखणे अवघडच नाही तर अशक्य आहे. मग अंदाज करा ही अभिनेत्री कोण आहे? काय झालं... कळत नाही. चला तर मग आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ही अभिनेत्री ४ दशकांपासून इंडस्ट्रीत कार्यरत आहे. तिची सर्वाधिक चर्चा तिच्या हसण्यामुळे होते.

कदाचित आत्तापर्यंत तुम्हाला कळले असेल की आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. होय... ती अर्चना पूरण सिंग आहे, हास्याची देवी जी ४० वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे आणि जेव्हाही ती हसते तेव्हा विश्व हादरते. द कपिल शर्मा शोमध्ये कायम जजच्या भूमिकेत दिसणारी अर्चना पूरण सिंग या फोटोमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. अर्चना पूरण सिंगचा हा तोंडात बोट धरून बसलेला फोटो अवघ्या वर्षाच्या असतानाचा आहे. सध्या अभिनेत्रीचं वय ५९ वर्षे आहे.

अर्चना पूरण सिंग ८०च्या दशकापासून इंडस्ट्रीत कार्यरत आहे.कॉमेडी रिएलिटी शोमध्येही ती चांगलीच पसंतीस उतरली आहे. कपिल शर्मा शोच्या आधी तिने कॉमेडी सर्कस सारख्या शोचं जज केले होते. याशिवाय तिने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टॅग्स :अर्चना पूरण सिंग