Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रिय मराठी मालिकेतील मुख्य अभिनेत्रीला ओळखलंत का? Mcdonalds मध्ये करायची काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 15:01 IST

सध्या या अभिनेत्रीची मालिका एक नंबरला आहे. आधी गुबगुबीत दिसणारी ही अभिनेत्री आता फारच बारीक दिसते.

सेलिब्रिटींचे जुने फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कित्येक फोटोत त्यांना ओळखणंही कठीण होतं. तसंच काही कलाकार अभिनय क्षेत्रात येण्याआधी साधी नोकरी करायचे. कोणी अगदीच बारीक तर कोणी फारच जाड दिसायचे. जुन्या आठवणी आणि फोटोंची बातच और असते. नुकताच एका मराठी अभिनेत्रीने तिचा एक जुना फोटो अपलोड केलाय. 'तुम्हे अपनी एक पुरानी तस्वीर दिखाऊ' असा ट्रेंड सध्या इन्स्टाग्रामवर सुरु आहे. त्यात तिने हा फोटो पोस्ट केलाय.

फोटोत दिसणारी ही मुलगी अतिशय गुबगुबीत दिसत आहे. तसंच तिने विशिष्ट गणवेश घातला आहे. गळ्यात आयकार्डही आहे. हा फोटो शाळेतला आहे असं वाटेल पण नाही हा फोटो पार्टटाईम जॉबवेळचा आहे.  सध्या या अभिनेत्रीची मालिका जोरदार सुरु आहे. तिची मालिकेत मुख्य भूमिका आहे. तर अभिनेत्रीच्या सख्ख्या बहिणीनेही नुकतंच एका वेगळ्या मालिकेतून कमबॅक केलं आहे. अभिनेत्रीने लिहिले,'माझा पहिला जॉब Mcdonalds मध्ये.' कोण आहे ही अभिनेत्री ओळखलंत का?

तर ही आहे मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde). होय कोणीही ओळखणार नाही कारण तितीक्षा आता अगदी बारीक दिसते. तर ही फोटोतील मुलगी गुबगुबीत आहे.पण ही तितीक्षाच आहे. ती आधी मॅकॉडोनाल्ड्समध्ये नोकरी करायची. तो तिचा पहिलाच जॉब होता. 

तितीक्षाच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्यात. कोणालाच विश्वास बसत नाहीए की ही तीच आहे. 'माझी क्युट बर्गर' अशी कमेंट तिची बहीण खुशबू तावडेने केलीए. तर तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ बोडकेने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तितीक्षा सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नेत्रा ही भूमिका साकारत आहे. सध्या ही मालिका खूपच लोकप्रिय  झाली आहे.

टॅग्स :तितिक्षा तावडेमराठी अभिनेतासोशल व्हायरल