Join us

शुभांगी गोखलेचा जावई आहे हा मराठी अभिनेता,मालिकेतून झाला होता प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 09:00 IST

दिवंगत अभिनेता मोहन गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या असलेल्या सखीने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कलाकारांची मुलं आणि मुलं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणं ही काही नवी गोष्ट नाही. आम्ही चालवू हा पुढे वारसा म्हणत चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मुलं मुली या क्षेत्रात येतात. हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत अशी कलाकारांच्या मुला-मुलींची उदाहरणं आहेत. आपल्या आई वडिलाप्रमाणे स्वतःच्या अभिनयाने त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशाच स्टार किड्सपैकी एक म्हणजे अभिनेत्री सखी गोखले. 

दिवंगत अभिनेता मोहन गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या असलेल्या सखीने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिल, दोस्ती, दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या सखीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सखी अमर फोटो स्टुडिओ या नाटकातही तिने काम केले होते.

सखी गोखलेने अभिनेता सुव्रत जोशीसह लग्न केले आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. घरच्यांच्या परवानगीने ते लग्नबंधनात अडकले.लग्न प्रचंड चर्चेत होतं.सखी आणि सुव्रत यांची पहिली भेट दुनियादारी या मालिकेच्या सेटवरच झाली होती. तिथूनच त्यांच्या प्रेमाला खरी सुरुवात झाली होती.

11 एप्रिल 2019 रोजी त्यांनी लग्न करून चाहत्यांना एकच धक्का दिला होता.जवळचे मित्र आणि नातेवाईक अश्या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला, त्यानंतर मुंबईत मोठ्या दिमाखात रिसेप्शन पार पडला. सध्या दोघंही उच्च शिक्षणाच्या निमित्ताने लंडनमध्येच आहेत.

सुव्रत आणि सखी दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या आयुष्यातल्या खास गोष्टींच्या अपडेट चाहत्यांसह शेअर करत असतात. दोघांच्या फोटोंनाही चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत असते. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळते.

 

लग्नाआधीपासून दोघांमध्येही तशीही खूप चांगली मैत्री होती. मात्र लग्नानंतर दोघांचे नाते आणखी घट्ट झाल्याचे पाहायला मिळते. दोघेही एकत्र फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा तर मिळवतातच शिवाय कपल गोलही देत असतात. दोघांचेही चाहते त्यांच्या फोटोंवर भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देताना दिसतात. 

टॅग्स :सुव्रत जोशीसखी गोखले