टिकू तलसानिया सजन रे फिर झुठ मत बोलो या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 15:38 IST
टिकू तलसानिया यांनी इश्क, राजा, अंदाज अपना अपना, हंगामा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सगळ्याच भूमिका गाजल्या ...
टिकू तलसानिया सजन रे फिर झुठ मत बोलो या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर कमबॅक
टिकू तलसानिया यांनी इश्क, राजा, अंदाज अपना अपना, हंगामा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सगळ्याच भूमिका गाजल्या आहेत. त्यांनी चित्रपटांप्रमाणे मालिकांमध्येदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी यह जो है जिंदगी, ये चंदा कानून है, गोलमाल है भाई सब गोलमाल है यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांची सजन रे झूठ मत बोलो ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत त्यांच्यासोबतच सुमीत राघवन, मुग्धा चाफेकर, अर्पणा मेहता, अमी त्रिवेदी, शालिनी खन्ना आणि राजीव ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या दुसऱ्या कार्यक्रमाची कास्ट खूपच वेगळी असणार आहे. या दुसऱ्या सिझनचे नाव सजन रे फिर झुठ मत बोलो असे असून या मालिकेत हुसैन कुवार्जेवाला प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. हुसैन हे नाव क्योंकी साँस भी कभी बहू थी, कुमकुम यांसारख्या मालिकांमुळे प्रकाशझोतात आले होते. तो अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याच्यासोबतच सना अमिन शेख या मालिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. सनाने काही महिन्यांपूर्वी कृष्णदासी या मालिकेत काम केले होते. यासोबतच सजन रे झूठ मत बोलो या मालिकेच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. या मालिकेतील टिकू तलसानिया प्रेक्षकांना दुसऱ्या सिझनमध्येदेखील पाहायला मिळणार आहे. टिकू सांगतात, मला सजन रे झूठ मत बोलो या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्येदेखील काम करायला मिळत आहे याचा मला आनंदच होत आहे. मी याआधीदेखील अनेकवेळा वडिलांच्या भूमिकेत झळकलो आहे. या सर्व भूमिकांच्या तुलनेत ही काहीशी वेगळी भूमिका आहे. या मालिकेचे कथानकदेखील वेगळे आहे. ते प्रेक्षकांना आवडेल असा मला विश्वास आहे.