Join us

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया युरोपमध्ये सेलिब्रेट करताहेत लग्नाचा पहिला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 13:21 IST

दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाला नुकतेच एक वर्षं झाले असून लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते दोघे युरोपला रवाना झाले ...

दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाला नुकतेच एक वर्षं झाले असून लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते दोघे युरोपला रवाना झाले आहेत. त्यांनी नुकतेच नच बलिये या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील मिळवले आहे.दिव्यांका आणि विवेकची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. विवेकसोबत लग्न करण्याआधी ​शरद मल्होत्रासोबत दिव्यांकाचे अफेअर होते. बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या दोघांची भेट झाली होती. त्या दोघांचे ट्युनिंग पाहाता ते लवकरच लग्नबंधनात अडकतील असे सगळ्यांना वाटत होते. पण काही कारणास्तव शरद आणि दिव्यांकाचे ब्रेकअप झाले. शरदसोबतचे नाते तुटल्यानंतर दिव्यांका अतिशय दुःखी होती. या काळात ती ये है मोहोब्बते या मालिकेत काम करत होती. एका वर्तनामपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा काळ तिच्यासाठी खूपच वाईट असल्याचे तिने कबूल केले होते. ये है मोहोब्बते या मालिकेत विवेक दहिया तिच्यासोबत काम करत होता. याच दरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली. तिच्या वाईट काळात विवेकने तिला साथ दिली. त्यांची ट्युनिंग पाहाता ते दोघे जीवनसाथी म्हणून योग्य असल्याचे याच मालिकेतील त्यांच्या एका सहकलाकाराला वाटले आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात झाली.विवेक आणि दिव्यांका यांच्यात अनेक गोष्टी सारख्या आहेत. त्या दोघांनाही पार्टींमध्ये जायला आवडत नाही. ते दोघेही दारू पित नाही तसेच स्मोकिंग करत नाहीत. अनेक गोष्टी आणि स्वभाव जुळून आल्यानंतर विवेक आणि दिव्यांकाने लग्नाचा विचार केला आणि चंदिगडमध्ये अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत त्यांनी साखरपुडा केला तर लग्न त्यांनी भोपाळ येथे केले. तसेच एक भव्य रिसेप्शनही चंडिगडला दिले. Also Read : दिव्यांका- विवेक म्हणाले, आम्हाला जिंकायचेच होते आणि आम्ही जिंकलो!