Join us

थकलेला चेहरा अन्..; मालिका सोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली दयाबेन, फोटो पाहून चाहते थक्क

By देवेंद्र जाधव | Updated: July 3, 2025 12:46 IST

सहा वर्षांनी दयाबेनची अवस्था पाहून चाहते थक्क, आता दिसते अशी. अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहत्यांना काळजी वाटली आहे

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही लोकप्रिय मालिका गेली अनेक वर्ष टीव्हीवर सुरु आहे. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी. दयाबेनची भूमिका साकारुन दिशाने सर्वांच्या मनावर राज्य केलं. २०१९ ला मात्र मातृत्वाच्या कारणामुळे दिशाने मालिकेतून एक्झिट घेतली. दिशा मालिकेत कमबॅक करेन, असं बोललं जात होतं. परंतु त्या आशा संपुष्टात आल्या आहेत. अशातच दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिका सोडल्यावर तब्बल सहा वर्षांनी दिशा कॅमेरासमोर आली असून तिला ओळखता येत नाही इतकी ती बदलली आहे.

सहा वर्षांमध्ये दिशा खूप बदलली

‘दयाबेन’च्या भूमिकेमुळे विशेष ओळख निर्माण करणाऱ्या दिशाचे नव्या लूकमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत ती पारंपरिक साडीत, अगदी साध्या वेशात दिसून येते. चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य, कपाळावर कुंकु अशा पारंपरिक अवतारात दिशा दिसून येते. 'तारक मेहता..'मध्ये उत्साहात गरबा खेळणारी दयाबेन थोडी थकल्यासारखी वाटतेय. दिशाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून, “दयाबेनला ओळखणंच कठीण होईल,” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत.

दिशा सहा वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर

दिशा वकानी २०१७ मध्ये पहिल्यांदा आई झाली. त्यानंतर २०२२ मध्ये तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. यानंतर तिने छोट्या पडद्यापासून दूर राहून संपूर्ण वेळ कुटुंबासाठी दिला. २०१५ मध्ये दिशा वकानीने मयूर पाडियासोबत विवाह केला होता. त्यानंतर काही वर्षांनी ती मालिकेतून ब्रेक घेत जणू गायब झाली. मात्र तिच्या पुनरागमनाच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. निर्माते आसित मोदी यांच्याकडूनही वेळोवेळी इशारे दिले गेले की, दयाबेनचं पात्र पुन्हा प्रेक्षकांसमोर येईल. मात्र दिशाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, मातृत्वामुळे तिच्यात झालेला भावनिक आणि शारीरिक बदल फोटो पाहून अनेकांना जाणवला.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनदिशा वाकानी