Join us  

अभिनेत्री दिशा परमारच्या चेहऱ्यावर आलाय प्रेग्नेंसी ग्लो, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 12:24 PM

दिशा परमारने तिचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसतोय.

'इंडियन आयडल' फेम राहुल वैद्य(Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमार(Disha Parmar) लवकरच आई-बाबा होणार आहेत. २०२१मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.18 मे 2023मध्ये दोघांनी गुडन्यूज शेअर केली त्यानंतर दोघांवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला होता. दिशाने आता एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो आलेला दिसतोय.  

लवकरच दिशा आई होणार आहे. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक क्युट सेल्फी पोस्ट केला आहे. यात ती ऑरेंज रंगाच्या टॉपमध्ये दिसतेय. दिशाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य दिसतेय. यासोबतच प्रेग्नेंसीचा ग्लो देखील अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आलेला स्पष्टपणे दिसतोय. हा फोटो शेअर करताना दिशा लिहिते, प्रेग्रेंन्सी दरम्यान माझं केस खूप चांगले झाले आहेत. यानंतर ही असेच असू देत, गळू देत नको.   

राहुल-दिशाची लव्हस्टोरी'बडे अच्छे लगते हैं 2' मालिकेमुळे दिशा परमारला प्रचंड पसंती मिळाली.  बिग बॉसच्या घरात राहुलने दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर ही जोडी सोशल मीडिया वर चांगलीच हीट ठरली. दरम्यान 2018 साली या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि लग्नंबधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.16 जुलैला मोठ्या थाटात दोघांचं  लग्न पार पडलं होतं. लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघे आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. 

टॅग्स :राहुल वैद्य