Join us  

विक्रम भट करणार या मालिकेचे दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 7:15 AM

स्टार प्लसवर ‘दिव्य दृष्टी’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथादिग्दर्शक विक्रम भट करणार ‘दिव्य दृष्टी’ मालिकेचे दिग्दर्शन

स्टार प्लस’वर ‘दिव्य दृष्टी’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते! अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो.

अमानवी शक्ती आणि भूत-पिशाच्च यासारख्या विषयांवरील यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन करण्याचा मोठा अनुभव बॉलीवूडचे दिग्दर्शक विक्रम भट यांना असल्याने या मालिकेच्या बऱ्याचशा भागाचे दिग्दर्शन त्यांनीच करावे, अशी विनंती या मालिकेच्या निर्मात्यांनी त्यांना केली आहे. विक्रम भट यांनी यापूर्वी राज, क्रीचर3डी वगैरे अमानवी शक्तींवरील यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्यात त्यांचे वैविध्य दिसून आले आहे. मालिकेतील दिव्या आणि दृष्टी या दोघी बहिणींकडे अशी अमानवी शक्ती असल्याने त्यांच्याशी संबंधित प्रसंग दिग्दर्शित करण्यास विक्रम भट यांच्याखेरीज दुसरी चांगली व्यक्ती कोण असेल. या मालिकेची भव्यता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी त्यांचे कौशल्यपूर्ण दिग्दर्शन करण्यास सांगण्यात येईल तसेच पिशाचिनी या व्यक्तिरेखेचे रेखाटन करण्यावरही ते चांगल्या सूचनाकरतील. अमानवी शक्तींच्या विषयावरील चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा व्यापक अनुभव असलेले विक्रम भट या मालिकेत त्यांच्या आवडत्या कलाकारांचाही समावेश करण्याची शक्यता आहे.

विक्रम भट यांना छोट्या पडद्यावर आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याची जादू पसरविताना ‘दिव्य दृष्टी’ या आगामी मालिकेत लवकरच फक्त स्टार प्लसवर पाहा.

टॅग्स :स्टार प्लसविक्रम भट