Join us  

'चला हवा येऊ द्या'मधील छोटूच्या पत्नीला पाहिलंत का?, तिच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 11:11 AM

Chala Hawa Yeu Dya Fame Ankur Wadhave: 'चला हवा येऊ द्या' या शोमधील छोटूच्या भूमिकेतून अभिनेता अंकुर वाढवे घराघरात पोहचला.

कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. तसेच प्रेक्षकांना ते पोटधरून हसवतात. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसेच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा विनोदवीर अभिनेता अंकुर वाढवे(Ankur Wadhave)चाही यात समावेश आहे. चला हवा येऊ द्या या शोमधील छोटूच्या भूमिकेतून तो घराघरात पोहचला. मात्र त्याची पत्नी प्रसिद्धीझोतापासून दूर राहणे पसंत करते. नुकतेच अंकुरने पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अंकुर वाढवे याने इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, तीन वर्षे काढलेस, रेटलेस, की संपवलेस माहीत नाही पण या सहनशीलतेवरून कळलं की अजून तू साथ देऊ शकतेस.

अंकुरने ही पोस्ट लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त केली आहे. अंकुर २८ जून, २०१९ रोजी यवतमाळमध्ये विवाहबंधनात अडकला. तो बऱ्याचदा सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो शेअर करताना दिसतो. त्याला एक मुलगीदेखील आहे. जिचे नाव ख्याती आहे. 

अंकुर अभिनेत्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स आणि कन्हैया या नाटकात काम केले आहे. तसेच जलसा चित्रपटातही त्याने काम केले आहे.  

टॅग्स :चला हवा येऊ द्याझी मराठी