Join us

अक्षया देवधरचा ट्रेडिशनल लूक पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 08:00 IST

 सुंदर आणि सालस अशा 'पाठक बाईंना' खऱ्या आयुष्यात पारंपारिकपणे तयार होऊन, दागिने घालून नटायची खूप आवड आहे.

ठळक मुद्देअक्षयाचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते आहे. सुंदर आणि सालस अशा 'पाठक बाईंना' खऱ्या आयुष्यात पारंपारिकपणे तयार होऊन, दागिने घालून नटायची खूप आवड आहे. अक्षया ही नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक पोशाख परिधान केलेले किंवा सुंदर नोझपिन आणि इतर अनेक छान व वेगळे दागिने घालून फोटो पोस्ट करते. अर्थातच छोट्याश्या दागिन्यामुळेदेखील अक्षयाचे सौंदर्य खुलून दिसते. अक्षयाचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत आणि ती नेहमीच त्यांना अपडेटेड ठेवण्यासाठी तिचे सुंदर फोटोज करत असते.

नुकतंच संपन्न झालेल्या झी मराठी अवॉर्ड्स २०१८ मध्ये देखील अक्षयाने एका सुंदर पैठणीचा घेरदार ड्रेस घातला होता, तसेच त्यावर दागिने आणि एक छोटी पण वेगळी नथ घातली होती. त्यामुळे अक्षया सगळ्यांमध्ये उठून दिसत होती.

तिच्या या आऊटफिटमधील फोटोला देखील प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला तसेच तिच्या या लुकवर कमेंट्स भरभरून दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर तिच्या चाहत्यांना तिचा पेहराव इतका आवडला कि तिच्या काही चाहत्यांनी तिच्या आऊटफिट सारखा सेम पैठणीचा ड्रेस शिवला आणि अक्षया सारख्याच पोज देऊन फोटो देखील काढले. अक्षयाने तिच्या या छोट्या फॅनचा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. पाठक बाई म्हणजेच अक्षयाच्या फॅशन सेन्सची तिच्या चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ आहे हे कळून येतं. अक्षया ही ट्रेन्डसेटर आहे हे म्हणणं खोटं ठरणार नाही.

टॅग्स :अक्षया देवधरतुझ्यात जीव रंगला