छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीतच रसिकांच्या मनात घर केले. यातील आप्पा, कांचन, अनिरूद्ध, अरूंधती, ईशा, अभिषेक, यश, गौरी आणि संजना या पात्रांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही खूप उत्सुक असतात. या मालिकेत कांचन देशमुखची भूमिका अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी साकारली आहे. या भूमिकेतून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की त्यांची सूनदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.
अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आत्मविश्वास, सून लाडकी सासरची, इना मीना डिका यासारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत. तर आभास हा या मालिकेतही त्यांनी काम केले आहे. सुरुवातीला सहकलाकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी सून लाडकी सासरची या चित्रपटात सासूची भूमिका केली.
अर्चना पाटकर यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल सांगायचे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हमरमळा हे त्यांचे सासर. महेंद्र पाटकर यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. अर्चना पाटकर यांची सूनदेखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अर्चना पाटकर यांचा मुलगा आदित्य पाटकर हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. तो हिंदी मालिकेसाठी काम करतो. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीचा दांडगा अनुभव त्याला आहे.